Balochistan Militants Attacks:पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतात बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनेने एकाच वेळी अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आत्मघाती हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये किमान 17 पाकिस्तानी सुरक्षाकर्मी(जवान) असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर BLA ने दोन महिला आत्मघाती हल्लेखोरांचे फोटो जारी केले आहेत.
BLA च्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी एका महिलेची ओळख 24 वर्षीय आसिफा मेंगल अशी असून ती बलूचिस्तानमधील नुश्की भागातील रहिवासी होती. ती मोहम्मद इस्माइल यांची मुलगी असून, तिचा जन्म 2 ऑक्टोबर 2002 रोजी झाला होता. संघटनेचा दावा आहे की, आसिफाने आपल्या 21व्या वाढदिवशी BLA च्या मजीद ब्रिगेडमध्ये प्रवेश केला होता आणि जानेवारी 2024 मध्ये आत्मघाती हल्लेखोर होण्याचा निर्णय घेतला. नुश्की येथील ISI मुख्यालयावर झालेला हल्ला आसिफाने केल्याचा दावा BLA कडून करण्यात आला आहे.
दुसऱ्या महिला हल्लेखोराची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यात ती हल्ल्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांसोबत दिसते. या व्हिडीओमध्ये ती पाकिस्तानी सरकारवर टीका करताना दिसत आहे.
पाकिस्तानी सुरक्षादलाची मोठी कारवाई
मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्यांनंतर पाकिस्तानी सुरक्षादलांनी मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी ऑपरेशन राबवले. बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी सांगितले की, सुमारे 40 तास चाललेल्या कारवाईत 140 हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीही हल्ल्यांमध्ये महिला आत्मघाती हल्लेखोरांचा सहभाग असल्याची पुष्टी केली आहे.
शाळा, बाजार, रुग्णालये लक्ष्य
पाकिस्तान सरकारच्या माहितीनुसार, हल्लेखोर सामान्य नागरिकांच्या वेषात शाळा, बाजारपेठा, बँका आणि रुग्णालयांमध्ये घुसले आणि तेथे अंदाधुंद गोळीबार केला. हे हल्ले शुक्रवारी रात्री सुरू झाले आणि शनिवारपर्यंत सुरू होते. यादरम्यान, नुश्की, ग्वादर, चमन, हब, नसीराबाद आणि मकरान या भागांमध्ये हल्ल्यांच्या घटना घडल्या.
बलूचिस्तान : पाकिस्तानचा सर्वात मोठा पण गरीब प्रांत
BLA ने हे हल्ले त्यांच्या ‘हेरोफ (ब्लॅक स्टॉर्म)’ मोहिमेचा दुसरा टप्पा असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बलूचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा पण सर्वात गरीब प्रांत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे हिंसाचार सुरू असून, बलूच संघटना अधिक स्वायत्तता आणि नैसर्गिक संसाधनांमध्ये न्याय्य वाटा मिळावा, अशी मागणी करत आहेत.
Web Summary : BLA claimed responsibility for Balochistan attacks, releasing photos of two female suicide bombers. The attacks, targeting security forces and civilians, resulted in numerous casualties. Pakistani forces launched counter-terrorism operations, killing over 140 militants.
Web Summary : बीएलए ने बलूचिस्तान हमलों की जिम्मेदारी ली, दो महिला आत्मघाती हमलावरों की तस्वीरें जारी कीं। सुरक्षा बलों और नागरिकों को निशाना बनाने वाले हमलों में कई लोग हताहत हुए। पाकिस्तानी बलों ने आतंकवाद विरोधी अभियान शुरू कर 140 से अधिक आतंकवादियों को मार गिराया।