Baba Vanga Predictions : भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. या उत्सुकतेला अधिकच हवा मिळाली आहे बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या काही जुन्या, पण धक्कादायक भाकितांमुळे, ज्यांची चर्चा पुन्हा एकदा जगभरात सुरू झाली आहे. २०व्या शतकातील सर्वात रहस्यमय व्यक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या बाबा वेंगाने २०२५ हे वर्ष संकटांनी भरलेले असेल, असे भाकीत केले होते.
२०२५ संकटांचे वर्ष?बाबा वेंगा यांनी २०२५बद्दल केलेली भाकिते विचारात घेण्यासारखी आहेत. त्यांच्या मते, या वर्षी जागतिक आर्थिक संकट उद्भवू शकते, ज्याचा परिणाम संपूर्ण जगभरातील बाजारपेठांवर होईल. त्यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, गोंधळलेल्या आणि संभ्रमात टाकणाऱ्या आर्थिक धोरणांमुळे देशांमधील तणाव वाढू शकतो, आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता निर्माण होऊ शकते.
बँकिंग यंत्रणा ढासळण्याचा इशाराबाबा वेंगा यांच्या मते, २०२५ मध्ये बँकिंग यंत्रणांवर मोठा आघात होण्याची शक्यता आहे. आर्थिक ताळेबंद ढासळल्याने अनेक देशांना गंभीर सामाजिक व राजकीय परिणामांचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्यानुसार, ही स्थिती इतकी बिकट असेल की हिंसाचार आणि सामाजिक अशांतता वाढू शकते, ज्याला त्यांनी 'मानवतेचा पतन' असे संबोधले होते.
अंधत्वानंतर मिळाले भविष्यदर्शनाचे वरदानबाबा वेंगा यांनी वयाच्या १२व्या वर्षी दृष्टी गमावली होती, पण त्यानंतर त्यांना भविष्यदृष्टी मिळाली असे म्हटले जाते. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या अचूक ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांना "बाल्कन नोस्ट्राडेमस" असेही म्हटले जाते. त्यांच्या याआधीच्या अचूक भाकितांमध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन, ९/११चा दहशतवादी हल्ला, अल कायदाचा उदय, जगातील नैसर्गिक आपत्तींचे अंदाज खरे ठरले आहेत.
५०७९पर्यंतची भाकिते केली!विशेष म्हणजे, बाबा वेंगा यांनी सन ५०७९पर्यंतच्या घटनांबाबत भाकिते केली आहेत. त्यांची अनेक भाकिते आजवर खरी ठरलेली असल्याने, २०२५च्या भाकितांकडेही गांभीर्याने बघितले जात आहे.