शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

Al Qaeda New Chief: कोण होणार अल कायदाचा नवीन म्होरक्या? जवाहिरीच्या मृत्यूनंतर 'या' नावाची जोरदार चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 12:27 PM

Ayman al Zawahiri Killing: 9/11 हल्ल्यातील दहशतवादी आणि अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीला अमेरिकेने ठार केले आहे.

Al Qaeda New Chief Name: अमेरिकेने अलकायदाचा (Al Qaeda) म्होरक्या आयमन अल-जवाहिरीचा (Ayman al-Zawahiri) खात्मा केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) अफगानिस्तानमध्ये ड्रोन हल्ला करून जवाहिरीला ठार केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीच जवाहिरीचा खात्मा केल्याची पुष्टी केली आहे. 11 सप्टेंबर, 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात जवाहिरीचा हात होता.

9/11 हल्ल्यात सहभाग

ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) सोबत मिळून जवाहिरीने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्याने हल्ल्यासाठी चार विमाने हायजॅक करण्यास मदत केली होती. यापैकी 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर, तिसरे पेंटागॉनवर आण चौथे विमान एका शेतात क्रॅश झाले होते. या घटनेत जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. अयमान अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर आता अल कायदा(Al Qaeda)चे प्रमुख पद रिकामे झाले आहे. त्यामुळे अल कायदाचा प्रमुख कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

या व्यक्तीच्या नावावर चर्चा..डेली मेलमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, सैफ अल आदिल (Saif al-Adel) याची अल कायदाचा प्रमुख म्हणून निवड होऊ शकते, अशी चर्चा आहे. सैफ अल आदिल इजिप्तच्या आर्मीमध्ये अधिकारी होता. याशिवाय, तो अल कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. अल कायदापूर्वी 1980 मध्ये तो दहशतवादी संघटना मकतब-अल-खिदमतमध्य होता. 

आतंकी सैफ अल आदिल की भूमिका अहमसैफ अल आदिल 30 वर्षांचा असताना त्याने सोमालियाच्या मोगादिशुमध्ये 'ब्लॅक हॉक डाउन' ऑपरेशनचे नेतृत्व केले होते. त्यात 19 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर एक रणनीतिकार म्हणून सैफ अल आदिलची भूमिका महत्वाची राहिली आहे. परंतू, सध्या आदिल कुठे आहे, याची माहिती नाही? काही मीडिया रिपोर्टनुसार, तो गेल्या 19 वर्षांपासून इरानमध्ये अडकून पडला आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाOsama Bin Ladenओसामा बिन लादेन