खामेनेईंची मुलगी आणि नात इस्रायली हल्ल्यात ठार! खामेनेईच्या मृत्यूच्या वृत्तानंतर तेहरानमध्ये नागरिकांचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 06:24 IST2026-03-01T06:23:40+5:302026-03-01T06:24:55+5:30

Ayatollah Khamenei granddaughter death: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खमेनेई यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांच्या खमेनेईच्या मृत्यूच्या दाव्यानंतर तेहरानमध्ये जल्लोष सुरू असून, शाळेवरील हल्ल्यात १०० मुले ठार झाल्याचा इराणचा दावा.

Ayatollah Khamenei Iran vs Israel war: Iran's Supreme Leader's daughter and granddaughter killed in Israeli strike! Citizens celebrate in Tehran after news of Khamenei's death | खामेनेईंची मुलगी आणि नात इस्रायली हल्ल्यात ठार! खामेनेईच्या मृत्यूच्या वृत्तानंतर तेहरानमध्ये नागरिकांचा जल्लोष

खामेनेईंची मुलगी आणि नात इस्रायली हल्ल्यात ठार! खामेनेईच्या मृत्यूच्या वृत्तानंतर तेहरानमध्ये नागरिकांचा जल्लोष

तेहरान/न्यूयॉर्क: इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या कुटुंबाला मोठा फटका बसला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात खामेनेई यांची मुलगी आणि नात यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनेई मारला गेल्याचा दावा केल्यानंतर इराणच्या राजधानीत, तेहरानमध्ये काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून आनंद साजरा करत असल्याचे चित्र आहे.

खामेनेई यांच्या निवासस्थानावर झालेल्या बॉम्बफेकीत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इराणी माध्यमांनी केली आहे. मात्र, खामेनेई स्वतः जिवंत आहेत की मृत, यावर इराण सरकारने अद्याप मौन बाळगले आहे.

तेहरानमध्ये जल्लोष

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, खामेनेई यांच्या संभाव्य मृत्यूबद्दल ट्रम्प यांनी विधान केल्यानंतर तेहरानच्या काही भागात लोकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. दशकांपासून असलेल्या कडक निर्बंधांनंतर नागरिकांचा हा संताप रस्त्यावर दिसत आहे.

१०० हून अधिक मुलांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रातील (UN) इराणचे राजदूत अमीर सईद इरावानी यांनी सुरक्षा परिषदेत इस्रायल आणि अमेरिकेवर कडाडून टीका केली. एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १०० हून अधिक निष्पाप मुलांचा बळी गेल्याचे त्यांनी सांगितले. शेकडो महिला आणि नागरिक या हिंसाचारात मारले गेले असून त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीची याचना केली आहे.

तणाव कमी करण्याचे आवाहन

इराणने जागतिक नेत्यांना तात्काळ हस्तक्षेप करण्याची आणि वाढता हिंसाचार थांबवण्याची विनंती केली आहे.

Web Title : हमले में खामेनेई के रिश्तेदार मारे गए; तेहरान में जश्न।

Web Summary : अयातुल्ला खामेनेई की बेटी और पोती की कथित तौर पर इजरायली-अमेरिकी हमले में मौत हो गई। ट्रम्प ने खामेनेई की मौत का दावा किया, जिससे तेहरान में जश्न शुरू हो गया। ईरान ने खामेनेई के आवास के पास परिवार के सदस्यों की मौत की पुष्टि की, लेकिन उनकी स्थिति अपुष्ट है। स्कूल में बमबारी में 100 से अधिक बच्चों की मौत के बाद ईरान ने हस्तक्षेप की गुहार लगाई।

Web Title : Khamenei's kin killed in strike; celebrations erupt in Tehran.

Web Summary : Ayatollah Khamenei's daughter and granddaughter reportedly died in an Israeli-US strike. Trump claimed Khamenei's death, sparking celebrations in Tehran. Iran confirmed family deaths near Khamenei's residence, but his status is unconfirmed. Iran pleads for intervention after school bombing kills over 100 children.