Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 06:35 IST2025-06-25T06:33:52+5:302025-06-25T06:35:23+5:30

‘नासा’ने याबाबतची घोषणा केली असून, स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन कॅप्सूलच्या (यान) माध्यमातून हे अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील.

'Axiom-4' mission: Indian astronaut Shubhanshu Shukla to launch into space today | Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारताच्या शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीरांना घेऊन जाणारी ‘ॲक्झिओम-४’ मोहीम आता नव्या नियोजनानुसार आज बुधवारी अमेरिकेच्या स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:०१वा.) निश्चित करण्यात आली आहे. 

नासा’ने याबाबतची घोषणा केली असून, स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन कॅप्सूलच्या (यान) माध्यमातून हे अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील. या मोहिमेचे नेतृत्व कमांडर पॅगी व्हिटसन या करीत असून, अंतराळवीर शुक्ला पायलट असतील. हंगेरीचा अंतराळीवर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उझ्नान्स्की विस्निव्हस्की तज्ज्ञ म्हणून सोबत असतील.

सहा वेळा प्रक्षेपण लांबले

या मोहिमेचे पहिले प्रक्षेपण २९ मे रोजी होणार होते. परंतु, स्पेसएक्सच्या फाल्कन रॉकेटच्या बूस्टरमध्ये द्रव ऑक्सिजन गळतीमुळे प्रक्षेपण लांबले. त्यानंतर विविध कारणांमुळे हे प्रक्षेपण लांबत होते. फ्लोरिडातील ‘नासा’च्या केनेडी अंतराळ केंद्रावरून हे यान प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेसाठी भारताने ५५० कोटी खर्च केले आहेत.

Web Title: 'Axiom-4' mission: Indian astronaut Shubhanshu Shukla to launch into space today

टॅग्स :NASAनासा