अमृता फडणवीस यांना ‘कान्स’ महोत्सवात पुरस्कार, प्रेझेंटेशनही दिलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 10:03 IST2022-05-28T09:51:52+5:302022-05-28T10:03:25+5:30
या महोत्सवाला अनेक प्रभावी व नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली

अमृता फडणवीस यांना ‘कान्स’ महोत्सवात पुरस्कार, प्रेझेंटेशनही दिलं
कान्स : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस या कान्स चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहिल्या. ‘अन्न, आरोग्य व शाश्वत विकास’ या गोष्टींबाबत अमृता फडणवीस यांनी कान्स चित्रपट महोत्सवामध्ये जनजागृती केली.
या महोत्सवाला अनेक प्रभावी व नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली. त्यात अमृता फडणवीस यांचा समावेश आहे. तेथील मास्टरमाइंड फोरममध्ये त्यांनी जनजागृती करणारे भाषणही केलेआपल्या कामगिरीने उत्तम बदल घडवून आणणाऱ्या, सकारात्मक विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींना या महोत्सवात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अमृता फडणवीस यांना सर्वोत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये शेरॉन स्टोन, स्कायलर ग्रिसवोल्ड, एच. ई. डॉमिनिक औट्टारा आदी नामवंतांचा समावेश आहे.