बॉडीबिल्डरने गर्लफ्रेन्डसोबत घेतला सेल्फी, हत्या करून बॉडी अॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये टाकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 18:26 IST2022-02-02T18:24:05+5:302022-02-02T18:26:36+5:30
Daily Star च्या एका वृत्तानुसार, गर्लफ्रेन्डची हत्या केल्यावर तिचं शरीर अॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये फेकल्यानंतर तिचे अवशेष पोलिसांना सापडले.

बॉडीबिल्डरने गर्लफ्रेन्डसोबत घेतला सेल्फी, हत्या करून बॉडी अॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये टाकली
ऑस्ट्रेलियात (Australia) एका बॉडीबिल्डरने आपल्या गर्लफ्रेन्डची हत्या करण्याआधी तिच्यासोबत सेल्फी घेतला आणि नंतर तिला त्याच घरात अॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये टाकलं. बॉडीबिल्डर मेराज जफरवर त्याच्या १९ वर्षीय प्रेयसी अमीना हयातची हत्या करण्याचा आरोप आहे
Daily Star च्या एका वृत्तानुसार, गर्लफ्रेन्डची हत्या केल्यावर तिचं शरीर अॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये फेकल्यानंतर तिचे अवशेष पोलिसांना सापडले. हत्येचा आरोप होण्यापूर्वी बॉयफ्रेन्डने आपल्या प्रेयसीसोबत काही दिवसांपूर्वीच तिचा एक फोटो शेअर केला होता. मेराजला पोलिसांनी अटक केली आहे.
असं सांगण्यात आलं की, या घटनेच्या काही दिवसांआधी या कपलचं लग्न झालं होतं. पण याचा पुरावा अजून सापडलेला नाही. हयातच्या बॉडीचे अवशेष ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात त्याच्या घरात सापले आहेत.
हयातची हत्या शनिवारी दुपार ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान झाली होती. तिचा मृतदेह सापडण्याच्या २४ तासांआधी. याचा अर्थ हा आहे की, हयात एक दिवसापेक्षा जास्त वेळ अॅसिडने भरलेल्या बाथटबमध्ये होती.
हयातने आपल्या कथित खून्याला भेटण्याआधी बांग्लादेश ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला होता. हत्येच्या काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी लग्न केलं होतं. हा रोमान्य असा होता ज्याने दोन्ही परिवारांना परेशान करून ठेवलं होत.
पोलीस अधिकारी जूली बूनने सांगितलं की, 'अधिकाऱ्यांनी घरात जबरदस्ती प्रवेश केला आणि बाथरूममध्ये त्यांना एका महिलेचा मृतदेह सापडला. मी फक्त इतकंच सांगू शकते की, घरातील बाथरूममध्ये रसायन आढळले होते. मी हे आताच सांगू शकत नाही की, ते रसायन काय होते'