दुबई : इस्रायलच्या लष्कराने मंगळवारी इराणमधील तेहरान, शिराझ व तब्रीझ या प्रमुख शहरांवर अमेरिकेच्या मदतीने संयुक्त हल्ले केल्याचा दावा केला. या हल्ल्यात या शहरांमधील कमांड सेंटर, क्षेपणास्त्र प्रक्षेपण ठिकाणे आणि हवाई संरक्षण प्रणाली लक्ष्य केल्याचे त्यांनी सांगितले. शिराझमध्ये अंतर्गत सुरक्षा दलाचे मुख्यालय व बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठिकाण उद्ध्वस्त, तर तब्रीझमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय केल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
आखाती प्रदेशातील संघर्ष तीव्र होत असून, मंगळवारी इराणने संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) फुजैराह येथे ड्रोन हल्ला केला. यात तेल साठवण प्रकल्पात आग लागली, मात्र जीवितहानी झाली नाही. हा भाग ओमान आखातालगत असून, यापूर्वीही त्याला लक्ष्य करण्यात आले होते. सरकारी वृत्तसंस्था डब्लूएएमनुसार स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या हल्ल्यानंतर यूएईने काही काळ हवाई क्षेत्र बंद केले. दरम्यान, इस्रायलने तेहरान आणि बैरुत येथे नवे हल्ले केले.
ट्रम्प यांची मदतीस न येणाऱ्या देशावर टीका -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीत सुरक्षा राखण्यासाठी अनेक देश मदतीस येत असल्याचा दावा केला, मात्र काही देशांच्या अनुत्साहावरही टीका केली. या संघर्षात आतापर्यंत इराणमध्ये १,३००, लेबनॉनमध्ये ८५० आणि इस्रायलमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण कोरियाची २६ जहाजे अडकली : दक्षिण कोरियाची २६ मालवाहतूक जहाजे व १८३ खलाशी हॉर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अडकले आहेत. अन्न, पाणी व इतर अत्यावश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दक्षिण कोरियाचे अधिकारी शेजारील देशांतील बंदर प्रशासनाशी संपर्क साधत आहेत. परिस्थिती आणखी बिघडल्यास अतिरिक्त उपाययोजना करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आखाती युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक ठप्प झाली आहे. नकाशातील लाल भाग जहाजे समुद्रात थांबल्याचे दर्शवतात. सौजन्य. मरिनट्रॅफिक
अमेरिकेने माघार घ्यावी ताजिकीस्तानमधील इराणचे राजदूत अली मोज्तबा रौजबेहानी यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या स्थैर्यासाठी अमेरिकेने आपले सैन्य माघारी घ्यावे, असे आवाहन केले. सामुद्रधुनी औपचारिकरीत्या बंद नसली तरी चालू संघर्षामुळे जहाजांची हालचाल जवळपास थांबली असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
तसेच अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणची पाणी प्रक्रिया केंद्रे आणि इंधन साठवण सुविधा लक्ष्य केल्याचा आरोपही त्यांनी केला. तर इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद कालिबाफ यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीतील ठप्प झालेली जहाज वाहतूक लवकर पूर्ववत होणे कठीण असल्याचे विधान केले आहे.
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडचे शांततेचे आवाहन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या परराष्ट्र व संरक्षण मंत्र्यांनी कॅनबेरा येथे झालेल्या बैठकीत मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाबद्दल चिंता व्यक्त केली. हा संघर्ष शक्य तितक्या लवकर थांबवून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी संयुक्तपणे नमूद केले.
Web Summary : Israel allegedly attacked Iranian cities with US aid, targeting key infrastructure. UAE faced a drone attack on a fuel depot. Hormuz Strait shipping halted, impacting South Korean vessels. Calls for de-escalation and US withdrawal intensified amid regional conflict.
Web Summary : इजरायल ने कथित तौर पर अमेरिकी सहायता से ईरानी शहरों पर हमला किया, जिसमें महत्वपूर्ण बुनियादी ढांचे को लक्षित किया गया। यूएई में एक ईंधन डिपो पर ड्रोन हमला हुआ। होर्मुज जलडमरूमध्य में जहाजरानी ठप, दक्षिण कोरियाई जहाजों पर असर। क्षेत्रीय संघर्ष के बीच तनाव कम करने और अमेरिकी वापसी का आह्वान तेज हुआ।