'हा तर संपूर्ण सोशल इंजिनिअरिंगवरील हल्ला' ; बाईडन, बिल गेट्स, ओबामा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक,
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:39 IST2020-07-17T05:43:16+5:302020-07-17T06:39:57+5:30
हॅकर्सनी हॅक केलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर त्यांनी बिटकॉईनच्या पत्त्यावर १,००० अमेरिकी डॉलर पाठविले, तर त्याबदल्यात २,००० अमेरिकी डॉलर मिळतील.

'हा तर संपूर्ण सोशल इंजिनिअरिंगवरील हल्ला' ; बाईडन, बिल गेट्स, ओबामा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक,
न्यूयॉर्क : दिग्गज नेते, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि अन्य प्रसिद्ध लोकांचे तसेच मोठ्या कंपन्यांचे ट्विटर अकाऊंट अज्ञात हॅकर्सनी हॅक केले. हा तर संपूर्ण सोशल इंजिनिअरिंगवरील हल्ला असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बाईडन, माईक ब्ल्यूमबर्ग आणि अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहेत. याशिवाय कान्ये वेस्ट आणि त्यांची पत्नी किम कर्दाशियां वेस्ट यांचे अकाऊंटही हॅक झाले आहेत.
हॅकर्सनी हॅक केलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जर त्यांनी बिटकॉईनच्या पत्त्यावर १,००० अमेरिकी डॉलर पाठविले, तर त्याबदल्यात २,००० अमेरिकी डॉलर मिळतील. यातून असे दिसून येत आहे की, या युजर्सच्या ट्विटर फॉलोअर्सला निशाणा बनविण्यात आले आहे.
बाईडन यांच्या प्रचार टीमने म्हटले आहे की, ट्विटर टीमने त्यांचे अकाऊंट हॅकनंतर काही मिनिटांतच लॉक केले आणि हे ट्विट हटविले, तर ओबामा कार्यालयाने यावर टिपणी केली नाही. ट्विटरच्या सपोर्ट टीमने म्हटले आहे की, अशा लोकांनी हे अकाऊंट हॅक केले आहेत ज्यांनी याअगोदर माइक्रो ब्लॉगिंग साईटच्या कर्मचाऱ्यांना यशस्वीपणे निशाणा केलेले आहे.