'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 20:25 IST2025-01-17T20:23:35+5:302025-01-17T20:25:25+5:30

भारतीय वंशाच्या साई वर्षीथ कंडुला या तरुणाला अमेरिकेतली न्यायालयाने दोषी ठरवत आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

'Attack was carried out with the intention of overthrowing the government'; Indian-origin youth sentenced to prison in US | 'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा

'सरकार उलथवण्याच्या उद्देशानेच केला गेला हल्ला'; भारतीय वंशाच्या तरुणाला अमेरिकत तुरुंगवासाची शिक्षा

Sai Varshith Kandula: अमेरिकेतली न्यायालयाने भारतीय वंशाच्या तरुणाला दोषी ठरवत आठ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. साई वर्षीथ कुंडला असे या भारतीय वंशाच्या तरुणाचे नाव असून, तो २० वर्षांचा आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पीटीआय वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, साईने २२ मे २०२३ रोजी व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. साई वर्षीथ कंडुला याने गेल्या वर्षी म्हणजे मे २०२४ मध्ये अमेरिकन मालमत्तेचं नुकसान करण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची कबुली दिली होती. 

कोर्टाच्या निकालात गंभीर टिप्पणी

अमेरिकेतली न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावताना म्हटले आहे की, "या हल्ल्याचा हेतू लोकशाही मार्गाने निवडून आलेले अमेरिकेतील सरकार उलथवून टाकणे आणि त्या जागी नाझी विचारधारेच हुकुमशाही सरकार आणणे हाच होता."

साई वर्षीथ कंडुलाबद्दल जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार, साई हा पश्चिम बंगालमधील चंदनगरचा आहे. तो ग्रीन कार्डसह अमेरिकेत कायमस्वरूपी नागरिक म्हणून वास्तव्याला आहे. 

आठ वर्षाच्या तुरुंगावासासह न्यायालयाने त्याला तीन वर्ष निगरानी खाली ठेवण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे तुरुंगातून सुटल्यानंतर त्याच्यावर नजर ठेवली जाईल. या काळात त्याला कोर्टाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेल. 

व्हाईट हाऊसवर हल्ला, नेमकं काय घडलं होतं?

साईने २२ मे  २०२३ रोजी दुपारी मिसोरीतील सेंट ल्युईसवरून वॉशिंग्टनसाठी विमान पकडलं. ५ वाजून २० मिनिटांनी तो विमानतळावर पोहोचला. तिथे त्याने ६.३० वाजता एक ट्रक भाड्याने घेतला. 

त्यानंतर वाशिग्टन डीसीला निघून गेला. रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी त्याने व्हाईट हाऊसबाहेर लावलेले बॅरिकेट्स उडवले. अचानक घडलेल्या घटनेने धावपळ उडाली. त्यानंतर साई ट्रकमधून खाली उतरला. ट्रकमधून त्याने नाझी ध्वज काढला आणि फडकवू लागला. याच दरम्यान, त्याला सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक झाली. 

Web Title: 'Attack was carried out with the intention of overthrowing the government'; Indian-origin youth sentenced to prison in US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.