ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 18:05 IST2025-10-02T18:03:35+5:302025-10-02T18:05:32+5:30
Attack On Synagogue In Britain: ब्रिटनमधील मँचेस्टर येथे ज्यूंचं प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर मोठा हल्ला झाला असून, या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सिनेगॉगवर हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला आहे.

ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार
ब्रिटनमधील मँचेस्टर येथे ज्यूंचं प्रार्थनास्थळ असलेल्या सिनेगॉगवर मोठा हल्ला झाला असून, या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सिनेगॉगवर हल्ला करणारा हल्लेखोर पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. हल्लेखोराकडे अनेक संशयित वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. सुरक्षा एजन्सींनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून, आजूबाजूच्या घरांना रिकामी करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला झाला तेव्हा सिनेगॉगमध्ये ज्यूंचा सण साजरा करण्यासाठी शेकडो लोक जमले होते. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने ऑपरेशन प्लाटो लागू केला. त्यानुसार अॅम्ब्युलन्स सेवा आणि एनएचएस ट्रस्ट्सनेसुद्धा मेजर इन्सिडेंट प्लॅन अॅक्टिवेट केला. तसेच आत अडकलेल्या लोकांना तिथेच थांबवून सुरक्षित भाग तयार करण्यात आला त्यानंतर अडकलेल्या लोकांना हळुहळू बाहेर काढण्यात आले.