अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 06:07 IST2026-01-06T06:07:36+5:302026-01-06T06:07:45+5:30
सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आहे का याची तपासणी करण्यात येत आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
सिनसिनाटी : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या ओहायो राज्यातील सिनसिनाटी येथील घरावर हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकरणी एकाला सोमवारी पहाटे तपास यंत्रणांनी अटक केली आहे.
हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. हल्ल्याची ही घटना घडली तेव्हा उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांचे कुटुंबीय घरात नव्हते तर वॉशिंग्टनला होते.
हल्ल्यामागच्या हेतूची चौकशी : व्हान्स यांच्या घरावर कोणत्या हेतूने हल्ला करण्यात आला याबद्दल अटक केलेल्या व्यक्तीची तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आहे का याची तपासणी करण्यात येत आहे.