Blast In Pakistan: पाकिस्तानमधील क्वेटा शहरात स्फोट, 16 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 11:12 IST2019-04-12T10:34:15+5:302019-04-12T11:12:11+5:30

पाकिस्तानमधील क्वेटा शहरात शुक्रवारी (12 एप्रिल) स्फोट झाला आहे. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत.

Atleast eight people killed and several injured in a blast at Quetta's Hazarganji Sabzi Mandi | Blast In Pakistan: पाकिस्तानमधील क्वेटा शहरात स्फोट, 16 जणांचा मृत्यू 

(Photo Credit - dawn source)

ठळक मुद्देपाकिस्तानमधील क्वेटा शहरात शुक्रवारी स्फोट झाला आहे.स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. क्वेटा येथील हजारगंजमधील 'सब्जी मंडी' परिसरात शुक्रवारी स्फोट झाला आहे.

इस्‍लामाबाद - पाकिस्तानमधील क्वेटा शहरात शुक्रवारी (12 एप्रिल) स्फोट झाला आहे. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटा येथील हजारगंजमधील 'सब्जी मंडी' परिसरात शुक्रवारी स्फोट झाला आहे. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 




Web Title: Atleast eight people killed and several injured in a blast at Quetta's Hazarganji Sabzi Mandi