शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 06:55 IST

२११ प्रवासी व १८ विमान कर्मचारी असलेले हे विमान मंगळवारी संध्याकाळी सिंगापूर येथील चांगी विमानतळावर उतरणार होते.

बँकॉक :  लंडनहून सिंगापूरला  निघालेल्या विमानाला मंगळवारी अचानक आलेल्या वाऱ्याच्या झंझावातामुळे (एअर टर्ब्युलन्स) जोरदार धक्के बसले. त्यामुळे अवघ्या सहा मिनिटांतच विमान  ३७ हजार फूटांवरून ३१ हजार फूट उंचीपर्यंत खाली आले. या घटनेत एका ब्रिटिश नागरिकाचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. त्यानंतर विमानाचे बँकॉक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानाला लंडनहून निघाल्यानंतर ११ तासांनी खराब हवामानामुळे वाऱ्याचे  तडाखे बसले. विमान कमी उंचीवर आणताना प्रवाशांनी सीट बेल्ट बांधावेत, अशी सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे काही प्रवासी  आसनांतून वर उडाले. त्यातील काहीजणांचे डोके लगेज कंटेनरवर आदळले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर ३० प्रवासी जखमी झाले. २११ प्रवासी व १८ विमान कर्मचारी असलेले हे विमान मंगळवारी संध्याकाळी सिंगापूर येथील चांगी विमानतळावर उतरणार होते. मात्र या घटनेनंतर विमान बँकॉक विमानतळावर उतरवताच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत विमानातील एका ब्रिटिश नागरिकाला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्या जीवितहानीबद्दल सिंगापूर एअरलाइन्सने तीव्र शोक व्यक्त केला.

असा बसतो एअर टर्ब्युलन्सचा तडाखा -विमानाच्या उड्डाणामध्ये हवेचा प्रवाह महत्त्वाची भूमिका बजावतो. जर या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण झाले तर विमानाला धक्के बसण्यास सुरुवात होते. उड्डाणाच्या मार्गावरून विमान भरकटते. अशा घटनांमध्ये अनेकदा विमान अचानक कमी उंचीवरही येते. या सगळ्या घटनेला अचानक आलेला वाऱ्याचा झंझावात (एअर टर्ब्युलन्स) असेही म्हटले जाते. विमानाला धक्के बसायला लागले व प्रवाशांनी सीट बेल्ट लावले नसतील तर त्यांचे डोके लगेज केबिनवर आदळणे, प्रवासी आसनावरून खाली पडणे असे प्रकार घडतात. त्यात ते जखमी होतात किंवा एखाद्याचा मृत्यूही होतो. 

टॅग्स :airplaneविमानAccidentअपघातDeathमृत्यू