शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:19 IST

Astronaut Sick News: ७ जानेवारी रोजी जेव्हा नासाने अंतराळात होणारी 'स्पेसवॉक' थांबवली, तेव्हाच काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती.

वॉशिंग्टन: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेल्या २५ वर्षांत जे घडले नाही, ते आता घडणार आहे. एका अंतराळवीराची प्रकृती बिघडल्याने 'नासा'ने संपूर्ण 'क्रू-११' टीमला नियोजित वेळेपूर्वीच तातडीने पृथ्वीवर परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अंतराळात उपचारांच्या मर्यादित सुविधा पाहता नासाने हा मोठा धोका पत्करण्यास नकार दिला आहे.

७ जानेवारी रोजी जेव्हा नासाने अंतराळात होणारी 'स्पेसवॉक' थांबवली, तेव्हाच काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर ८ जानेवारीला नासाने अधिकृतपणे जाहीर केले की, क्रू-११ च्या सदस्यांना काही दिवसांतच परत आणले जाईल. जरी आजारी अंतराळवीराची प्रकृती सध्या स्थिर असली, तरी अंतराळातील प्रतिकूल वातावरण पाहता त्यांना तिथे ठेवणे सुरक्षित नाही, असे नासाचे मत आहे.

२५ वर्षांत पहिल्यांदाच अशी वेळआंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या इतिहासात आतापर्यंत अनेक तांत्रिक बिघाड झाले आहेत, पण केवळ एका सदस्याच्या आजारपणामुळे संपूर्ण मोहिमेचे सर्व सदस्य परत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. नासाने स्पष्ट केले आहे की, कोणतीही दुर्घटना किंवा दुखापत झालेली नाही, तर हे केवळ आरोग्याशी संबंधित प्रकरण आहे.

कोण आहेत हे अंतराळवीर?माइक फिंके (अमेरिका), जेना कार्डमॅन (अमेरिका), किमिया युई (जपान), ओलेग प्लाटोनोव (रशिया) हे अंतराळवीर ऑगस्ट २०२५ पासून अंतराळात गेलेले आहेत. ते आता परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

नासाचे सावध पाऊलआजारी अंतराळवीराला नेमका कोणता आजार झाला आहे, हे नासाने अद्याप गोपनीय ठेवले आहे. मात्र, "कोणतीही आणीबाणी नाही, तरीही सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे," असे नासाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sick Astronaut Prompts NASA to Abort ISS Mission After 25 Years

Web Summary : For the first time in 25 years, an astronaut's illness has prompted NASA to cut short an International Space Station (ISS) mission. The entire 'Crew-11' team will return early due to limited medical facilities in space, despite the astronaut's stable condition. Details of the illness are undisclosed.
टॅग्स :NASAनासा