‘त्या’ लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही! आज किंवा उद्या पृथ्वीजवळून जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:31 AM2022-01-18T07:31:15+5:302022-01-18T07:31:37+5:30

अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. 

Asteroid twice the size of Burj Khalifa to fly past Earth on January 18 | ‘त्या’ लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही! आज किंवा उद्या पृथ्वीजवळून जाणार

‘त्या’ लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही! आज किंवा उद्या पृथ्वीजवळून जाणार

Next

मुंबई :  ७४८२ (१९९४ पीसी वन) हा लघुग्रह १८ किंवा १९ जानेवारी रोजी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असल्याची बातमी सर्वत्र गेली आहे, त्यात काहीही तथ्य नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. 
अशी काही दुर्घटना घडेल, याबद्दल भीती बाळगण्याचे काही कारण नाही. १.१ किमी व्यासाचा हा लघुग्रह पृथ्वीपासून १९ लक्ष ८१ हजार ४६८ किमी. अंतरावरून जाणार आहे. हे अंतर पृथ्वी-चंद्र अंतराच्या साडेपाच पटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे सोमण यांनी सांगितले.

७४८२ (१९९४ पीसीवन) या लघुग्रहाचा शोध ९ ऑगस्ट १९९४ रोजी रॉबर्ट मॅकनॉट यांनी स्लाइडिंग स्प्रिंग वेधशाळेतून लावला. हा लघुग्रह ५७२ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. मात्र, कधी कधी तो पृथ्वीच्या जवळून जातो. १७ जानेवारी १९३३ रोजी तो पृथ्वीजवळून गेला होता. आता यानंतर १८ जानेवारी २१०५ रोजी तो पृथ्वीजवळून जाणार आहे. अशाप्रकारे पृथ्वीजवळून भ्रमण करणाऱ्या हजार लघुग्रहांचा तपशील शास्त्रज्ञांना मिळाला आहे. एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे हे अगोदर समजल्यास त्याचा मार्ग बदलणे किंवा तो आदळण्यापूर्वीच त्याचे तुकडे करणे यावरही संशोधन सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत, असे सोमण यांनी सांगितले.

हे माहिती आहे का?
१९०८ मध्ये रशियातील तुंगस्का परिसरात ६० मीटर व्यासाची अशनी पृथ्वीवर आदळली होती. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मेक्सिको युकातान प्रदेशात १० किमी व्यासाची अशनी आदळल्यामुळे डायनासोर नष्ट झाले होते. ५२ हजार वर्षांपूर्वी ६० मीटर लांबीचा २० लक्ष टन वजनाचा अशनी पाषाण भारतात लोणार येथे आदळला होता.

Web Title: Asteroid twice the size of Burj Khalifa to fly past Earth on January 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app