ऑनलाइन फॅशन जगतातील प्रसिद्ध नाव, १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; पोलिसांना वेगळाच संशय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:28 IST2026-02-21T13:27:14+5:302026-02-21T13:28:18+5:30

ASOS Co-founder Quentin Griffiths Death: ऑनलाइन फॅशन विश्वात क्रांती घडवणारे आणि एएसओएस या जागतिक ब्रँडचे ब्रिटीश सह-संस्थापक क्वेंटिन ग्रिफिथ्स (वय,५८) यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. थायलंडमधील एका १८ मजली इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला.

ASOS Co-founder Quentin Griffiths Dies After Fall from 17th Floor Balcony in Thailand | ऑनलाइन फॅशन जगतातील प्रसिद्ध नाव, १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; पोलिसांना वेगळाच संशय!

ऑनलाइन फॅशन जगतातील प्रसिद्ध नाव, १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; पोलिसांना वेगळाच संशय!

ऑनलाइन फॅशन क्षेत्रातील जागतिक दिग्गज कंपनी एएसओएसचे ब्रिटीश सह-संस्थापक क्वेंटिन ग्रिफिथ्स (वय, ५८) यांचा थायलंड येथील एका इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जागतिक उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासात पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

ग्रिफिथ्स हे थायलंडमधील एका १८ मजली इमारतीत वास्तव्यास होते. या इमारतीच्या १७ व्या मजल्यावरील त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून ते खाली पडले. त्यांचा मृतदेह जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ग्रिफिथ्स त्यांच्या खोलीत एकटेच होते आणि अपार्टमेंटचा दरवाजा आतून बंद होता. सीसीटीव्ही फुटेज आणि प्राथमिक तपासात कोणत्याही प्रकारचा घातपात किंवा बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपाचे पुरावे आढळलेले नाहीत. 

पत्नीसोबत कायदेशीर वाद

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रिफिथ्स हे गेल्या काही काळापासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते. ग्रिफिथ्स यांचा पत्नीसोबत कायदेशीर वाद सुरू होता. त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर ६,७३,००० डॉलरपेक्षा जास्त रक्कम चोरल्याचा आणि बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीचे शेअर्स विकल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी गेल्या वर्षी त्यांना अटकही झाली होती आणि त्याचा तपास अद्याप सुरू होता. या सततच्या कायदेशीर कटकटींमुळे ते हतबल झाले होते, असे त्यांच्या एका मित्राने पोलिसांना सांगितले. 

अॅज सीन ऑन स्क्रीन: ग्लोबल ब्रँड

क्वेंटिन ग्रिफिथ्स यांनी २००० मध्ये निक रॉबर्टसन आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने लंडनमध्ये अॅज सीन ऑन स्क्रीन या कंपनीची स्थापना केली. टीव्ही आणि चित्रपट सेलिब्रेटींच्या कपड्यांपासून प्रेरणा घेऊन सुरू झालेली ही कंपनी अल्पावधीतच जागतिक ब्रँड बनली. एकेकाळी या कंपनीचे मूल्य ८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले होते. ब्रिटनची राजकुमारी केट मिडलटन आणि अमेरिकेच्या माजी प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी देखील या ब्रँडचे कपडे परिधान केले आहेत.

Web Title : ASOS के सह-संस्थापक की थाईलैंड में मौत: कानूनी विवादों के बीच आत्महत्या का संदेह

Web Summary : ASOS के सह-संस्थापक क्वेंटिन ग्रिफ़िथ्स की थाईलैंड में एक इमारत से गिरने के बाद मौत हो गई। पुलिस को आत्महत्या का संदेह है, क्योंकि उनका अपनी पत्नी के साथ कानूनी विवाद चल रहा था, जिसमें चोरी और धोखाधड़ी के आरोप शामिल हैं। ग्रिफ़िथ्स की कंपनी का मूल्य कभी 8 अरब डॉलर से अधिक था।

Web Title : ASOS Co-founder Dies in Thailand: Suicide Suspected Amid Legal Battles

Web Summary : ASOS co-founder Quentin Griffiths died after falling from a Thai building. Police suspect suicide due to ongoing legal disputes, including accusations of theft and fraud from his wife. Griffiths' company, once valued at over $8 billion, was globally recognized.