पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 12:48 IST2026-04-08T12:46:55+5:302026-04-08T12:48:45+5:30

Asim Munir Donald Trump Deal ceasefire: इराण-अमेरिका युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीमागे न्यूयॉर्कमधील 'रुझवेल्ट हॉटेल'चा सौदा असल्याची चर्चा आहे. जनरल आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिलेल्या ऑफरचे 'सीक्रेट' वाचा...

Asim Munir Donald Trump Deal: Pakistan's 'dirty secret' of mediation! Deal for 1000 rooms made, Asim Munir offered Trump Rs 8,300 crore for Iran War ceasefire | पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर

पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर

अमेरिका आणि इराणमधीलयुद्धातपाकिस्तान 'मध्यस्थ' म्हणून कसा काय समोर आला, या प्रश्नाने अनेकांना बुचकळ्यात टाकले होते. मात्र, आता यामागचे एक धक्कादायक 'डील' समोर आले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील एका ऐतिहासिक हॉटेलचे आमिष दाखवून 'मध्यस्थी'चे टॅग मिळवल्याचा दावा केला जात आहे.

इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...

न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये पाकिस्तानची एक मौल्यवान सरकारी मालमत्ता आहे – 'रुझवेल्ट हॉटेल'. १९२४ मध्ये बांधलेले हे ८ मजली हॉटेल १,००० खोल्यांचे असून त्याची किंमत सुमारे ८,३०० कोटी रुपये आहे. कोरोना काळात बंद पडलेले हे हॉटेल आता अमेरिका आणि पाकिस्तान मिळून विकसित करणार आहेत. अहवालानुसार, जनरल मुनीर यांनी ट्रम्प यांच्या 'बिझनेस माईंड'चा फायदा घेत या हॉटेलचा सौदा केला आणि त्या बदल्यात ट्रम्प यांनी पाकिस्तानला युद्धात मध्यस्थ म्हणून पुढे केले.

ट्रम्प यांचा 'बिझनेस' आणि मुनीर यांचा स्वार्थ
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही युद्धाच्या नावाखाली शस्त्रविक्रीतून आणि स्टॉक मार्केटमधून नफा कमावल्याचे आरोप झाले आहेत. आता पाकिस्तानच्या या आलिशान हॉटेलमध्ये भागीदारी मिळवून ट्रम्प यांनी मोठा आर्थिक फायदा करून घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारण्यासाठी आसिम मुनीर यांनी चक्क सरकारी संपत्तीच पणाला लावली आहे.

मध्यस्थीचे खरे क्रेडिट कोणाला?
जरी पाकिस्तान या करारात समोर दिसत असला, तरी ट्रम्प यांनी स्वतःच मान्य केले आहे की इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यात चीनची भूमिका महत्त्वाची होती. मात्र, आसिम मुनीर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आणि लष्कराची प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या तिजोरीवर डल्ला मारत ही 'हॉटेल डील' फत्ते केली आहे.

Web Title : पाकिस्तान की मध्यस्थी का 'गंदा रहस्य': ट्रंप को होटल का सौदा!

Web Summary : पाकिस्तान के सेना प्रमुख ने कथित तौर पर ट्रंप को न्यूयॉर्क में रूजवेल्ट होटल का सौदा पेश करके मध्यस्थता भूमिका हासिल की, जिसकी कीमत ₹8,300 करोड़ है। मुनीर पर निजी लाभ को प्राथमिकता देने का आरोप है।

Web Title : Pakistan's mediation 'dirty secret': Hotel deal offered to Trump!

Web Summary : Pakistan's army chief allegedly secured a mediation role by offering Trump a deal on Roosevelt Hotel, a valuable property in New York, worth ₹8,300 crores. Critics accuse Munir of prioritizing personal gain.