प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न, ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 22:42 IST2021-06-06T22:37:49+5:302021-06-06T22:42:14+5:30

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे. हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असं या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे.

The arrival of the princess in the British royal family, Kanyaratna to prince Harry And Merkel | प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न, ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन

प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न, ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन

ठळक मुद्देप्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे. हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असं या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे.

लंडन - ब्रिटनचे शाही जोडपे प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल लवकरच आई-बाबा बनणार असल्याची बातमी केसिंग्टन पॅलेसने काही दिवसांपूर्वीच दिली होती. प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ही बातमी शेअर करण्यात आली. आता, या शाही जोडप्याच्या आयुष्यात लहान परीचे आगमन झाले आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. 

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या प्रवक्त्यानं ही गोड बातमी दिली आहे. हॅरी आणि मेगन यांना शुक्रवारी कन्यारत्न प्राप्त झालं असून लिलिबेट लिली डायना असं या चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलं आहे. लिलिबेट हे महाराणीचं लोकप्रिय नाव आहे. तर, डायना हे नाव प्रिंस हेरी यांच्या मातोश्रींच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. याबाबत माहिती होताच, जगभरातून शाही कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याबद्दल, सर्वांचे आभारही कुटुंबीयांकडून मानण्यात आले आहेत. हेरी आणि मर्केल यांना पहिला मुलगा असून त्याचे नाव आर्ची आहे. 

2018 मध्ये लग्नबंधनात अडकले

मे २०१८ मध्ये प्रिन्स हॅरी व मेगन मार्केल लग्नबंधनात अडकले होते. हॉलिवूडची अभिनेत्री मेगन मार्केल घटस्फोटित असून अमेरिकन टीव्ही मालिका सुट्समध्ये तिने प्रमुख भुमिका साकारली होती. त्यानंतर २०११ मध्ये तिने अमेरिकन निमार्ता ट्रेवर एंजलसनसोबत लग्न केले होते. मात्र, २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. प्रिन्स हॅरी आणि मेगनची भेट २०१६ मध्ये एका मित्राच्या घरी झाली होती. त्यानंतर, हॅरीने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, तो मेगनने मान्य केला होता. प्रिन्स हॅरी ३३ वर्षांचे असून मेगन ३६ वर्षांची आहे.  
 

Web Title: The arrival of the princess in the British royal family, Kanyaratna to prince Harry And Merkel