बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 00:18 IST2025-12-26T00:17:38+5:302025-12-26T00:18:43+5:30
Bangladesh News: गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. दरम्यान, दीपू दास याची जमावाने हत्या केल्यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाचा आता आणखी एका हिंदू तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरू आहेत. दरम्यान, दीपू दास याची जमावाने हत्या केल्यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाचा आता आणखी एका हिंदू तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अमृत मंडल उर्फ सम्राट असं या मृत तरुणाचं नाव आहे. अमृत मंडल याला भर बाजारात बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याचा मृत्यू होईपर्यंत जमाव त्याला मारहाण करत राहिला.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पांग्शा उपजिल्ह्यातील होसैनडांगा ओल्ड मार्केट येथे घडली. मात्र पोलिसांनी नागरिकांना त्वरित याची माहिती दिली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृत मंडल याच्याविरोधात खंडणी वसुलीचे कथित आरोप होते. पांग्शान मॉडेल पोलीस ठाण्याचे ओसी शेख मोईनूल इस्लाम यांनी आज सकाळी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अमृत मंडल ऊर्फ सम्राट हा पोलिसांच्या रेकॉर्डवर नोंद अशलेल्या सम्राट वाहिनीचा म्होरक्या होता. तो होसैनडांगा गावातील रहिवासी अक्षय मंडल याचा मुलगा होता. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.