बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:23 IST2026-01-01T17:12:33+5:302026-01-01T17:23:02+5:30
बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार अजूनही सुरुच आहेत. आज गुरुवारी पुन्हा एका हिंदू व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोन हिंदू तरुणांची जमावाने हत्या केल्याचे समोर आले होते. हिंदूवरील हल्ले थांबत नाहीत. आता पुन्हा एकदाएका हिंदू व्यक्तीवर हल्ला झाल्याचे समोर आले. शरीयतपूर परिसरात खोकन चंद्रा नावाच्या एका हिंदू व्यक्तीला जमावाने घेरले. त्याला आधी क्रूरपणे मारहाण करण्यात आली, नंतर चाकूने मारले आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटच्या क्षणी, व्यापारी खोकन चंद्रा यांनी जवळच्या तलावात उडी मारून आपला जीव वाचवला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९.०० वाजता कानेश्वर युनियनमधील तिलोई परिसरात हा क्रूर हल्ला झाला. खोकण चंद्र दास (४०) हा परेश चंद्र दास यांचा मुलगा आहे. दामुड्यातील केउरभंगा बाजारात त्यांची फार्मसी आहे. बुधवारी रात्री खोकण चंद्र दास दुकान बंद करून घरी निघाले. जेव्हा ते तिलोई परिसरात पोहोचले तेव्हा काही गुन्हेगारांनी त्यांना अडवले.
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि नंतर त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. आगीतून जीव वाचवण्यासाठी खोकण चंद्र दास यांनी जवळच्या तलावात उडी मारली. नंतर स्थानिकांनी त्यांना गंभीर अवस्थेत वाचवले आणि शरीयतपूर सदर रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. हल्ल्यामागील हेतू आणि त्यात सहभागी असलेल्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.