बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:37 IST2025-12-30T17:37:03+5:302025-12-30T17:37:22+5:30
Bangladesh Crime News: गेल्या काही काळापासून बांगलादेशमध्ये सुरू असलेली हिंदूंवर हल्ल्यांची मालिका अखंडपणे सुरू आहे. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल या हिंदू तरुणांच्या हत्यांना काही दिवस लोटत नाहीत तोच बांगलादेशमधील मैमनसिंह येथे आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या, बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
गेल्या काही काळापासून बांगलादेशमध्ये सुरू असलेली हिंदूंवर हल्ल्यांची मालिका अखंडपणे सुरू आहे. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल या हिंदू तरुणांच्या हत्यांना काही दिवस लोटत नाहीत तोच बांगलादेशमधील मैमनसिंह येथे आणखी एका हिंदू व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील कपड्यांच्या गिरणीत ही हत्या झाली आहे. २२ वर्षीय आरोपी नोमन मियाँ याने शॉट गनच्या मदतीने गोळीबार करत ४२ वर्षीय बजेंद्र बिस्वास याचा जीव घेतला आहे.
येथील कापड गिरणीमध्ये वाद उफाळून आला होता. त्यादरम्यान, २२ वर्षीय नोमन मियाँ याने बजेंद्र बिस्वास याची गोळ्या झाडून हत्या केली. मृत बजेंद्र बिस्वास हा गावाचं रक्षण करणाऱ्या पॅरामिलिट्री ग्रुपचा भाग होता, अशी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कपड्याच्या फॅक्टरीमध्ये हिंसक जमावासमोर मारहाण झाली. यादरम्यान, नोमान मियाँ नावाच्या २२ वर्षीय तरुणाने बजेंद्र बिस्वास याच्यावर शॉटगन ताणली, तसेच जमावासमोरच त्याच्यावर गोळीबार केला. हा गोळी बजेंद्र याच्या डाव्या खांद्यात घुसली. तसेच त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी नोमान मियाँ याला अटक करण्यात आली आहे.
याआधी मैमनसिंह येथीलच एका कापडाच्या गिरणीतून दीपू चंद्र दास चाला जमावाने खेचून नेले होते. त्यानंतर बेदम मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती. एवढंच नाही तर दीपू चंद्र दास याच्या मृतदेहाला झाडाला लटकवून त्याला आग लावण्यात आली होती.