पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 11:20 IST2025-06-03T11:19:45+5:302025-06-03T11:20:08+5:30
Terrorist Killed In Pakistan: गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले जात आहेत. दरम्यान, आता पाकिस्तामधील आणखी एक कुख्यात दहशतवादी मारला गेला आहे.

पाकिस्तानमध्ये भारताच्या आणखी एका शत्रूचा अंत, जैश-ए-मोहम्मदचा कुख्यात दहशतवादी मौलाना अब्दुल अजीजचा रहस्यमयरीत्या मृत्यू
गेल्या काही काळापासून पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणारे अनेक दहशतवादी मारले जात आहेत. दरम्यान, आता पाकिस्तामधील आणखी एक कुख्यात दहशतवादी मारला गेला आहे. जैश ए मोहम्मदचा सीनियर कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसर याचा मृत्यू झाला आहे. मौलाना अब्दुल अजीज इसर याचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानमधील अनेक कुख्यात दहशतवादी हे अज्ञातांकडून होणारा गोळीबार किंवा इतर कारणांनी मारले गेले आहेत. हल्लीच लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्लाह खालिदला अज्ञात हल्लेखोराने ठार केले होते. तर आतापर्यंत पाकिस्तानात १५ हून अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार झालेत. त्यातील बहुतांश दहशतवादी भारतातील हल्ल्यात सहभागी होते. हे दहशतवादी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी होते. त्यातील एक मोठे नाव अबू कताल जो लश्करात टॉप टेररिस्ट होता. जम्मू काश्मीरातील अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग होता. याचवर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानात झेलम परिसरात त्याला अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले. NIA च्या यादीत तो मॉस्ट वॉटेंड दहशतवादी होता.