शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:59 IST

वॉशिंग्टन : इस्रायलच्या आर्यन डोमप्रमाणे अमेरिकासुद्धा स्वतःची संरक्षण सीस्टिम  गोल्डन डोम बनवणार आहे. याची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ...

वॉशिंग्टन : इस्रायलच्या आर्यन डोमप्रमाणे अमेरिकासुद्धा स्वतःची संरक्षण सीस्टिम  गोल्डन डोम बनवणार आहे. याची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यासाठी एक डिझाइनदेखील निवडण्यात आले आहे. जगाच्या कोणत्याही भागातून सोडलेले क्षेपणास्त्र रोखण्यास हे डोम सक्षम असेल. ट्रम्प यांनी दावा केला की गोल्डन डोम अंतराळातून होणारे हल्ले रोखण्यास देखील सक्षम असेल.

कधी सुरू होईल? माझा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२९ मध्ये पूर्ण होण्यापूर्वीच ही प्रणाली कार्यरत होईल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. 

किती खर्च येणार? गोल्डन डोम प्रकल्पाची किंमत सुमारे १७५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १४.५२ लाख कोटी रुपये असेल. ट्रम्प यांनी सुरुवातीला २५ अब्ज डॉलर्स (सुमारे २.०५ लाख कोटी रुपये) खर्च करण्यास मान्यता दिली आहे. पहिल्यांदा क्षेपणास्त्र डिफेन्स सिस्टीमचे नाव ‘मूनशॉट प्लस’ होते. नंतर ते ‘गोल्डन डोम’ असे बदलण्यात आले.

अमेरिकेला कुणाचा धोका? अमेरिकेच्या एका संरक्षण संस्थेने ऑक्टोबर २०२३ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये चीन, रशिया आणि उत्तर कोरियाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दल माहितीदेण्यात आली. चीनकडे ४००, रशियाकडे ३५० आणि उत्तर कोरियाकडे काही क्षेपणास्त्रे आहेत जी लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात. उत्तर कोरिया बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची संख्या सतत वाढवत आहे. अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला तोंड देण्यासाठी हे आव्हान निर्माण करू शकतात. यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.

आर्यन डोम-गोल्डन डोममध्ये कुणाची ताकद अधिक? 

इलॉन मस्क यांना आणखी श्रीमंत करणारा हा प्रकल्प गोल्डन डोममुळे अमेरिकन लोकांना फायदा होईल का, की ते इलॉन  मस्क किंवा इतर मोठ्या उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर वॉरेन एलिझाबेथयांनी म्हटले आहे.

जबाबदारी कुणावर? ट्रम्प यांनी ही जबाबदारी अंतराळ दलाचे जनरल मायकेल गुएटलिन यांना दिली आहे. त्यांना ट्रम्प यांच्या सर्वातविश्वासू लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जाते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUnited Statesअमेरिका