जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:59 IST2025-05-22T07:58:35+5:302025-05-22T07:59:05+5:30
वॉशिंग्टन : इस्रायलच्या आर्यन डोमप्रमाणे अमेरिकासुद्धा स्वतःची संरक्षण सीस्टिम गोल्डन डोम बनवणार आहे. याची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ...

जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका?
वॉशिंग्टन : इस्रायलच्या आर्यन डोमप्रमाणे अमेरिकासुद्धा स्वतःची संरक्षण सीस्टिम गोल्डन डोम बनवणार आहे. याची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यासाठी एक डिझाइनदेखील निवडण्यात आले आहे. जगाच्या कोणत्याही भागातून सोडलेले क्षेपणास्त्र रोखण्यास हे डोम सक्षम असेल. ट्रम्प यांनी दावा केला की गोल्डन डोम अंतराळातून होणारे हल्ले रोखण्यास देखील सक्षम असेल.
कधी सुरू होईल?
माझा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ २०२९ मध्ये पूर्ण होण्यापूर्वीच ही प्रणाली कार्यरत होईल, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली.
किती खर्च येणार?
गोल्डन डोम प्रकल्पाची किंमत सुमारे १७५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १४.५२ लाख कोटी रुपये असेल. ट्रम्प यांनी सुरुवातीला २५ अब्ज डॉलर्स (सुमारे २.०५ लाख कोटी रुपये) खर्च करण्यास मान्यता दिली आहे. पहिल्यांदा क्षेपणास्त्र डिफेन्स सिस्टीमचे नाव ‘मूनशॉट प्लस’ होते. नंतर ते ‘गोल्डन डोम’ असे बदलण्यात आले.
अमेरिकेला कुणाचा धोका?
अमेरिकेच्या एका संरक्षण संस्थेने ऑक्टोबर २०२३ मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये चीन, रशिया आणि उत्तर कोरियाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेबद्दल माहिती
देण्यात आली.
चीनकडे ४००, रशियाकडे ३५० आणि उत्तर कोरियाकडे काही क्षेपणास्त्रे आहेत जी लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात.
उत्तर कोरिया बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची संख्या सतत वाढवत आहे. अमेरिकन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला तोंड देण्यासाठी हे आव्हान निर्माण करू शकतात. यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे.
आर्यन डोम-गोल्डन डोममध्ये कुणाची ताकद अधिक?
इलॉन मस्क यांना आणखी श्रीमंत करणारा हा प्रकल्प
गोल्डन डोममुळे अमेरिकन लोकांना फायदा होईल का, की ते इलॉन मस्क किंवा इतर मोठ्या उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे डेमोक्रॅटिक
पक्षाच्या सिनेटर वॉरेन एलिझाबेथ
यांनी म्हटले आहे.
जबाबदारी कुणावर?
ट्रम्प यांनी ही जबाबदारी अंतराळ दलाचे जनरल मायकेल गुएटलिन यांना दिली आहे. त्यांना ट्रम्प यांच्या सर्वात
विश्वासू लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक मानले जाते.