इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:05 IST2026-03-14T17:02:58+5:302026-03-14T17:05:08+5:30

युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. अमेरिकेच्या सैन्याने खार्ग बेटावरच हवाई हल्ले केले. 

America's biggest attack on Iran so far; Why is Kharg Island a 'lifeline'?, What did Trump say? | इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले?

इराणवर अमेरिकेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला;  खार्ग बेट का आहे 'लाइफलाइन'?, ट्रम्प काय म्हणाले?

"काही वेळापूर्वीच माझ्या आदेशानुसार अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने मध्य पूर्वेतील इतिहासातील सर्वात शक्तिशाली हल्ल्यांपैकी एक हल्ला केला आणि खार्ग बेटावर असलेल्या सर्व लष्करी तळे पूर्णपणे नष्ट केली आहेत. खार्ग बेट इराणच्या सर्वात महत्त्वाच्या संपत्तींपैकी एक मानले जाते." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे खार्ग बेटावर हल्ला केल्याचे जाहीर केले. त्यानंतर इराणला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये असेही म्हणाले की, "माणुसकी आणि नैतिक कारणांमुळे मी या बेटावर असलेल्या तेल साठ्यांना लक्ष्य न करण्याचा निर्णय घेतला आहे."

लष्करी तळांवर हल्ले, तेल ठिकाणे सुरक्षित

फारस खाडीजवळ असलेले हे छोटे बेट इराणच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र आहे. अमेरिकेने खार्ग बेटावरील इराणच्या लष्करी ठिकाणांवर जोरदार हल्ले केले आहेत. इराणने असा दावा केला आहे की, खार्ग बेटावर असलेल्या तेल ठिकाणांवर उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. 

खार्ग बेट इराणसाठी का महत्त्वाचे?

अमेरिकेने खार्ग बेटावर केलेल्या हल्ल्यात कोणत्याही तेल प्रकल्पाचे नुकसान झालेले नाही. रिपोर्टनुसार खार्ग बेटावर १५ पेक्षा जास्त स्फोट झाले आणि अनेक ठिकाणांहून धुराचे लोट उठताना दिसले. 

अमेरिकेने खार्ग बेटावर असलेल्या लष्करी तळे, जोशन सी बेस, विमानतळाचा नियंत्रण कक्ष आणि हेलिकॉप्टर हँगरला निशाणा बनवले. हे बेट इराणसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण इराणचे ९० टक्के कच्चे तेल इथूनच जगभरातील वेगवेगळ्या देशात जाते. 

खार्ग बेट इराणच्या दक्षिणेला असून, बुशेहर सीमेपासून ५५ किमी दूर फारस खाडीमध्ये आहे. या बेटाच्या आजूबाजूला पाण्याची खोली खूप आहे. इथे जगातील सर्वात मोठी जहाजेही उभी राहू शकतात. पाईपलाईनद्वारे कच्चे तेल इथे आणले जाते आणि नंतर टँकर्समध्ये भरून जगभरात निर्यात केली जाते. 

इराण एकूण तेल निर्यातीपैकी ८५ ते ९० टक्के तेल निर्यात यााच बेटावरून करतो. त्यामुळे या बेटाला इराणची लाइफलाइन म्हटले जाते. प्राचीन काळात समुद्रमार्गे व्यापाराचे हे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे.

Web Title : अमेरिका का ईरान के खर्ग द्वीप पर हमला: ट्रंप का दावा, लाइफलाइन पर निशाना

Web Summary : ट्रंप के आदेश पर अमेरिकी सेना ने ईरान के खर्ग द्वीप पर सैन्य ठिकानों पर हमला किया, जो एक महत्वपूर्ण तेल निर्यात केंद्र है। तेल भंडार को बख्शा गया, लेकिन सैन्य बुनियादी ढांचे को भारी नुकसान हुआ। खर्ग ईरान के तेल निर्यात के लिए महत्वपूर्ण है।

Web Title : US strikes Iran's Kharg Island: Key lifeline targeted, Trump claims.

Web Summary : US forces, under Trump's orders, attacked military facilities on Iran's Kharg Island, a vital oil export hub. Oil reserves were spared, but military infrastructure suffered heavy damage. Kharg is crucial for Iran's oil exports.