अमेरिकन एक्स्प्रेसच्या अध्यक्षांचे निधन

By Admin | Updated: May 30, 2015 23:35 IST2015-05-30T23:35:38+5:302015-05-30T23:35:38+5:30

अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे अध्यक्ष एड गिलिगन (५५) यांचे विमानात आकस्मिक निधन झाले. गिलिगन हे न्यूयॉर्कला घरी परतत असताना विमानात अचानक आजारी पडले.

American Express President dies | अमेरिकन एक्स्प्रेसच्या अध्यक्षांचे निधन

अमेरिकन एक्स्प्रेसच्या अध्यक्षांचे निधन

न्यूयॉर्क : अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे अध्यक्ष एड गिलिगन (५५) यांचे विमानात आकस्मिक निधन झाले. गिलिगन हे न्यूयॉर्कला घरी परतत असताना विमानात अचानक आजारी पडले. विमानाला तातडीने उतरविण्यात आले.
गिलिगन १९८० मध्ये कंपनीत रुजू झाले होते. ३५ वर्षांच्या कारकीर्दीची त्यांची सुरुवात शिकावू म्हणून झाली होती. नंतर ते उपाध्यक्ष झाले. त्यानंतर ते २००७ मध्ये कंपनीच्या बिझनेस टू बिझनेस विभागाचे प्रमुख झाले. गिलिगन यांच्या मागे पत्नी आणि चार मुले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: American Express President dies