शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

भारत चीन चकमक; सीमेवर अमेरिकेची बारीक नजर, अशी आली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:18 AM

भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देया चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे.चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या जवानांसोबत झटापट करून त्यांना डिवचले - अमेरिकासंयुक्त राष्ट्राचे शांतता राखण्याचे आवाहन

नवी दिल्ली/वॉशिंग्टन :भारत आणि चीनदरम्यान असलेल्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले. तर या चकमकीत चीनचेही 43 सैनिक गंभीररित्या जखमी झाल्याचे आणि त्यातील काही जण ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच एएनआय वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर चार भारतीय जवानांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया -भारत आणि चीनदरम्यानच्या तणावपूर्ण परिस्थितीवर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे, लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, आम्ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) भारत आणि चिनी सैन्यातील तणावाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारतीय लष्कराने मंगळवारी एक निवेदन जारी करून गलवान खोऱ्यात 20 जवानांना हौतात्म्य आल्याचे सांगितले होते. आम्ही त्यांच्या कुटूंबीयांप्रती शोक व्यक्त करतो.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

अमेरिकन परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यांनी म्हटले होते, की भारत आणि चीन दोघांनीही डी-एस्कलेट करन्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच आम्हीही सद्य स्थितीत शांततापूर्ण मार्गाचे समर्थन करतो. ते म्हणाले 2 जूनला फोनवरून राष्ट्रपती ट्रम्प आणि पीएम मोदी यांनी भारत-चीन सीमेवरील परिस्थितीवर चर्चा केली आहे. 

India China Dispute : गलवान खोऱ्यात चीननं पसरवलय जाळं; हळू-हळू अशी वाढवली ताकद

काय म्हणतायंत अमेरिकन माध्यमं -अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तांमध्ये म्हणण्यात आले आहे, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या जवानांसोबत झटापट करून त्यांना डिवचले आहे. 15 जूनला रात्री उशिरा झालीली हिंसक झटापट म्हणजे, चिनी सैनिकांनी डी-एस्कलेशनदरम्यान असलेली स्थिती एकतर्फी बदलन्याचा प्रयत्न केल्याचा परिणाम आहे.

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका 

संयुक्त राष्ट्राचे शांतता राखण्याचे आवाहन -संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचे प्रवक्ता एरी कनेको यांनी पत्रकार परिषदेत, 'भारत आणि चीन यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या चकमकीसंदर्भात आणि मृत्यूसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आम्ही या दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचे आवाहन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.'

CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कारण

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाUSअमेरिकाUnited StatesअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प