भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:28 PM2020-06-16T15:28:52+5:302020-06-16T15:31:59+5:30

यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल.

indian and china army clash china foreign ministry asked do not take unilateral action  | भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

भारताचे तीन जवान शहीद, चीनचे पाच सैनिक ठार; घाबरलेला चीन म्हणतो- एकतर्फी पाऊल उचलू नका

googlenewsNext
ठळक मुद्देया चकमकीत चीनचेही 5 सैनिक मारले गेल्याचे समजते.लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. 'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले.

बिजिंग :भारत-चीनसीमा वाद सुरू असतानाच, लडाख सीमेवर चीनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत भारतील लष्कराच्या एका अधिकाऱ्याला आणि दोन जवानांना हौतात्म्य आले. या चकमकीत चीनचेही 5 सैनिक मारले गेल्याचे समजते. चीननेही ही घटना अत्यंत गांभिर्याने घेतली आहे. यासंदर्भात चीनीच्या पराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत, या संपूर्ण प्रकरणावर चीन गंभीर आहे. आम्ही भारताला आवाहन करतो, की त्यांनी एकतर्फी कारवाई सारखे पाऊल उचलू नये आणि हे प्रकरण अधिक वाढवू नये.

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

रॉयटर्स या वृत्त संस्थेने म्हटले आहे, की लडाख सीमेवर दोन्ही देशांदरम्यान अत्यंत तणावाचे वातावरण आहे. सध्या दोन्ही सैन्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. यापूर्वी मंगळवारी सकाळी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले होते, सीमा वादावर दोन्ही देशांत सकारात्मक चर्चा सरू आहे आणि लवकरात लवकर काही मार्ग निघेल. भारतीय लष्कराने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हणण्यात आले आहे, की  'गलवान खोऱ्यात डि-एस्कलेशन प्रक्रियेदरम्यान गेल्या रात्री दोन्ही सैन्य समोरा-समोर आले. यात आपले जवान शहीद झाले. यात एक अधिकारी आणि दोन सैनिकांचा समावेश आहे.

CoronaVirus News: 18 राज्यांतून येतेय 'खूश खबर'; पण, 'या' राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा 'स्फोट'!

भारतावरच केला आरोप -
एकीकडे भारताला एकतर्फी पाऊल उचलू नये, असे आवाहन करणारा चीन दुसरीकडे भारतीय लष्करच या हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचे म्हणत आहे. चीनने सरकारी माध्यम ग्लोबल टाइम्सच्या माध्यमाने भारतावर सीमा ओलांडून कराराचे उल्लंघण केल्याचा आरोप केला आहे. चीनने आरोप केला आहे, की भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा हिंसाचार झाला. एवढेच नाही, तर भारताने आपल्या लष्कराला करारानुसार सीमा ओलांडण्यापासून रोखायला हवे. यामुळे अशा प्रकारची चकमक पुन्हा उद्भवणार नाही, असे आवाहनही चीनने केले आहे.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

...तर चीनचंच मोठं नुकसान -
भारत आणि चीन यांच्यात यापूर्वी 1967 मध्ये झाडप झाली होती. म्हणजे बरोबर 53 वर्षांपूर्वी. ही चकमक सिक्किममध्ये उडाली होती. भारत आपल्या हद्दीत 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. यामुळे चीन चिडला होता. 1967च्या या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते.

Read in English

Web Title: indian and china army clash china foreign ministry asked do not take unilateral action 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.