ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 22:12 IST2025-07-09T22:10:23+5:302025-07-09T22:12:14+5:30
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरिया आणि जापानस 14 देशांवर टॅरिफ लादला आहे. यानंतर आज या 6 देशांवरही टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे...

ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अनेक देशांसाठी नव्या टॅरिफ दरांची घोषणा केली आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले, अमेरिका, फिलिपीन्सवर 25 टक्के, इराकवर 30 टक्के, मोल्दोव्हावर २५ टक्के कर लादणार आहे, जो १ ऑगस्टपासून लागू होईल. यासोबतच, अमेरिका अल्जेरियावर ३० टक्के, लिबियावर ३० टक्के आणि ब्रुनेईवर २५ टक्के कर लादणार आहे.
फिलीपिन्स: २५%
ब्रुनेई: २५%
अल्जेरिया: ३०%
मोल्दोव्हा: २५%
इराक: ३०%
लिबिया: ३०%
तत्पूर्वी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दक्षिण कोरिया आणि जापानस 14 देशांवर टॅरिफ लादला आहे. यानंतर आज या 6 देशांवरही टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोध कराल तर आणखी १०% टॅरिफ लावू -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर रविवारी एका पोस्ट शेअर केली होती. यात, ‘‘ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांशी जोडल्या जाणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लावले जाईल. याला कोणीही अपवाद राहणार नाही. याकडे लक्ष दिल्याबद्दल आपले धन्यवाद,” असे म्हणण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, ब्रिक्स समूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे ५ मुख्य देश आहेत. तर २०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियाला सामील करून घेण्यात आले आहे.