इराण युद्धातच अमेरिकेची आणखी एका देशात सैन्य कारवाई; 'इक्वाडोर'मध्ये उतरवले जवान, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 10:55 IST2026-03-04T10:55:16+5:302026-03-04T10:55:48+5:30

दीर्घ काळापासून संपूर्ण भागात दहशत आणि हिंसाचार पसरवणाऱ्या नार्को-दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे आवश्यक ती कारवाई करत आहोत असं त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

America military action in another country during the Iran war; Soldiers landed in 'Ecuador', why? | इराण युद्धातच अमेरिकेची आणखी एका देशात सैन्य कारवाई; 'इक्वाडोर'मध्ये उतरवले जवान, कारण काय?

इराण युद्धातच अमेरिकेची आणखी एका देशात सैन्य कारवाई; 'इक्वाडोर'मध्ये उतरवले जवान, कारण काय?

मध्य पूर्वेत इराणविरोधातअमेरिका- इस्रायल यांच्यातील युद्धामुळे तणावाची परिस्थिती आहे. त्यातच अमेरिकेने दक्षिण अमेरिकन देश इक्वाडोर'मध्ये दहशतवादी संघटनांविरोधात ऑपरेशन सुरू केले आहे. अमेरिका आणि इक्वाडोर यांनी दहशतवादी संघटनांविरोधात संयुक्त सैन्य कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई कॅरेबियन समुद्र आणि ईस्टर्न पॅसिफिकमधील जहाजांवर अमेरिकन लष्कराकडून हल्ले केले जात आहेत. या जहाजांद्वारे ड्रग्स वाहतूक केली जात असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे.

एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, यूएस आणि इक्वाडोर यांचे संयुक्त ऑपरेशन लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये नार्को दहशतवादाच्या धोक्यापासून संरक्षण करण्याचा आहे. अमेरिकेच्या विशेष दलाचे सैनिक देशभरातील संशयित ड्रग्ज शिपमेंट सुविधा आणि इतर ड्रग्जशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यासाठी इक्वेडोरच्या कमांडोंना सल्ला आणि पाठबळ देत आहेत. त्याशिवाय अमेरिकन सैन्य छापेमारीत सहभागी नाही परंतु ते इक्वाडोरच्या सैनिकांच्या ऑपरेशन प्लॅनिंगमध्ये मदत करत आहेत आणि त्यांना इंटेलिजेंस, लॉजिस्टिक्स सपोर्ट देताहेत. दीर्घ काळापासून संपूर्ण भागात दहशत आणि हिंसाचार पसरवणाऱ्या नार्को-दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे आवश्यक ती कारवाई करत आहोत असं त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

तर आम्ही इक्वाडोरच्या सैनिकांचे या लढाईतील सहभागाचे कौतुक करतो. ज्यांनी आपल्या देशाला नार्को दहशतवादाविरोधात लढण्याचे धाडस दाखवले असं मिलिट्री साऊथ कमांडर जनरल फ्रान्सिस एल डोनोवन यानी म्हटलं. त्यांच्याकडून ३० सेकंदाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. ज्यात एक हेलिकॉप्टर उड्डाण घेत आहे. एका परिसरात ते सैनिकांना लिफ्ट करते. या व्हिडिओत देशभरात होणाऱ्या अनेक छापेमारीपैकी पहिली धाड आहे. काही ठिकाणी अमेरिकन सल्लागार आहेत तर काहीमध्ये फक्त इक्वाडोर सैन्य सहभागी आहे असंही मिलिट्री साऊथ कमांडकडून सांगण्यात आले.

इक्वाडोर हा जगातील सर्वात मोठा ड्रग्स निर्यातदार देश आहे. तो त्याचे उत्पादन करत नाही तर कोलंबिया आणि पेरूमध्ये कार्यरत गुन्हेगारी टोळीसाठी तो ट्रॅफिकिंग रूटचे काम करतो. जनरल डोनोवन यांनी कार्टेल्सशी लढण्यात या देशाच्या भूमिकेचे कौतुक केले आणि इक्वाडोरला या प्रदेशातील घोषित दहशतवादी संघटनांना रोखण्यासाठी आणि त्यांचा नाश करण्यासाठी अमेरिकेचा मजबूत सहकारीही म्हणून उल्लेख केला. 

Web Title : ईरान तनाव के बीच इक्वाडोर में अमेरिकी सैन्य कार्रवाई: क्या है कारण?

Web Summary : ईरान तनाव के बीच, अमेरिकी सैनिक इक्वाडोर में ड्रग कार्टेल से लड़ रहे हैं। संयुक्त अभियान ड्रग तस्करी को लक्षित करते हैं, जिसमें अमेरिका इक्वाडोरियाई बलों को सहायता प्रदान कर रहा है। इक्वाडोर की भूमिका एक प्रमुख पारगमन मार्ग के रूप में स्वीकार की जाती है।

Web Title : US Military Action in Ecuador Amidst Iran Tensions: Why?

Web Summary : Amidst Iran tensions, US troops are in Ecuador combating drug cartels. Joint operations target drug trafficking, with US providing support to Ecuadorian forces. Ecuador's role as a key transit route for drugs is acknowledged.