इराणवर मोठ्या हल्ल्याची अमेरिकेकडून तयारी, उभय देशांमधील चर्चा निष्फळ, ट्रम्प झाले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:25 IST2026-01-30T11:24:38+5:302026-01-30T11:25:05+5:30

USA Preparing For A Major Attack on Iran: इराणने आपला अणू कार्यक्रम व आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्मिती मर्यादित ठेवण्याबाबत नकार दिल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिका व इराणमधील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.

America is preparing for a major attack on Iran, talks between the two countries are fruitless, Trump becomes aggressive | इराणवर मोठ्या हल्ल्याची अमेरिकेकडून तयारी, उभय देशांमधील चर्चा निष्फळ, ट्रम्प झाले आक्रमक

इराणवर मोठ्या हल्ल्याची अमेरिकेकडून तयारी, उभय देशांमधील चर्चा निष्फळ, ट्रम्प झाले आक्रमक

वॉशिंग्टन  - इराणने आपला अणू कार्यक्रम व आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्मिती मर्यादित ठेवण्याबाबत नकार दिल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती चिघळली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकाइराणमधील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल या वेबसाइटवर इराणने आपला अणू कार्यक्रम सोडून द्या, अन्यथा गेल्या हल्ल्यापेक्षा अधिक संहारक हल्ल्याला सामोरे जावे, अशी धमकी दिली आहे. 

अमेरिकेची संभाव्य रणनीती
इराणचे बडे नेते आणि आंदोलकांच्या हत्येस जबाबदार असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर हवाई हल्ल्यांचा विचार ट्रम्प सध्या करत आहेत.तसेच युरेनियम संवर्धन कायमची बंद करण्यासाठी इराणची अणुकेंद्रे आणि सरकारी संस्थांवरही हल्ले करण्याचे पर्याय अमेरिकेपुढे आहेत. हिंदी महासागरात अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका दाखल झाल्यामुळे अमेरिकेचे लष्करी पर्याय  भक्कम झाले आहेत.अमेरिकेने या भागात ‘पॅट्रियट’ व ‘थाड’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तैनातीस  सुरुवात केली आहे. अमेरिकेचे हवाई दल पश्चिम आशियात काही दिवस सराव करणार आहे. 

Web Title : ईरान पर बड़े हमले की अमेरिकी तैयारी, वार्ता विफल

Web Summary : ईरान के परमाणु कार्यक्रम पर वार्ता विफल होने के बाद, अमेरिका ने सैन्य कार्रवाई की धमकी दी है। ट्रंप ने ईरान को परमाणु गतिविधियों को रोकने की चेतावनी दी है। संभावित अमेरिकी रणनीतियों में ईरानी नेताओं, परमाणु स्थलों और सरकारी सुविधाओं पर हमले शामिल हैं। क्षेत्र में सैन्य निर्माण तेज।

Web Title : US Prepares Major Attack on Iran After Talks Fail

Web Summary : Following failed talks on Iran's nuclear program, the US threatens military action. Trump warns of devastating consequences if Iran doesn't halt its nuclear activities. Potential US strategies include strikes on Iranian leaders, nuclear sites, and government facilities. Military build-up in the region intensifies.