अमेरिका होतंय 'अपग्रेड'! बी-२ बॉम्बर विसरून जाल, येतंय अधिक धोकादायक बी-२१ जेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 19:41 IST2025-07-10T19:41:02+5:302025-07-10T19:41:25+5:30

B21 जेटची रडारवर अदृश्य राहण्याच्या क्षमतेची चाचणी झाल्याचीही चर्चा

America is getting an 'upgrade' Forget the B-2 bomber, the more dangerous B-21 jet is coming | अमेरिका होतंय 'अपग्रेड'! बी-२ बॉम्बर विसरून जाल, येतंय अधिक धोकादायक बी-२१ जेट

अमेरिका होतंय 'अपग्रेड'! बी-२ बॉम्बर विसरून जाल, येतंय अधिक धोकादायक बी-२१ जेट

अलिकडेच जेव्हा अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानच्या अण्वस्त्र तळांवर हल्ला केला, तेव्हा बी-२ विमानांच्या बंकर बस्टर बॉम्ब आणि टोमहॉक क्षेपणास्त्रांनी कहर केला. पण आता अमेरिका बी-२१ रेडर नावाचे आणखी धोकादायक शस्त्र युद्धभूमीवर आणणार आहे. हे नवीन शस्त्र हवेत उडू शकतो आणि वेळ आल्यावर ते पूर्णपणे रडारवरून लपू शकते.

रडारवर अदृश्य राहण्याच्या क्षमतेची चाचणी

बी-२१ रेडर हा अमेरिकेचा सर्वात गुप्त संरक्षण प्रकल्प आहे. परंतु काही ओपन सोर्स इंटेलिजेंस (OSINT) आणि उपग्रह डेटाने त्याची तयारी उघड केली आहे. अलिकडेच, कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअर फोर्स बेसवर बी-२१ च्या अनेक चाचण्या झाल्याचे दिसून आले. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ही उड्डाणे रडारवर अदृश्य राहण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी होती. म्हणजेच, हा बॉम्बर हवेत असतो पण रडारला त्याच्या ठिकाणाचा सुगावाही लागत नाही.

बी-२ बॉम्बरपेक्षा बी-२१ वेगळे कसे आहे?

बी-२ स्पिरिट आणि बी-२१ रेडर हे दोन्ही स्टेल्थ बॉम्बर्स आहेत. परंतु बी-२१ पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भविष्यातील युद्धांसाठी डिझाइन केले गेले आहे. बी-२ रडारपासून वाचण्यात काही अंशी यशस्वी होते. तर बी-२१ चे स्टेल्थ तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे, ज्यामुळे ते जवळजवळ अदृश्यच होते. बी-२ मधील उष्णतेचा विसर्ग कमी करण्याचा प्रयत्न बी-२१ मध्ये करण्यात आला असून, ते संपूर्ण थर्मल मास्किंग सिस्टम आहे, जी इन्फ्रारेड डिटेक्शन देखील टाळते. याशिवाय, बी-२१ मध्ये एआय आणि हेल्थ मॉनिटरिंग सारख्या स्मार्ट क्षमता देखील जोडण्यात आल्या आहेत. यामुळे विमानाला स्वतःचे तांत्रिक दोष शोधण्यास मदत होते.

स्फोटाशिवाय शस्त्रांचा सराव

आतापर्यंत कोणत्याही शस्त्र चाचणीबद्दल अधिकृत बोलले गेलेले नाही. परंतु अशी बातमी आहे की जुलै २०२५ मध्ये ओपन बे आणि 'डमी' बॉम्ब टाकणे या चाचण्या होतील. म्हणजेच, बॉम्ब स्फोट केले जाणार नाहीत पण युद्धजन्य परिस्थितीचा सराव होईल. लीक झालेल्या माहितीवरून असे सूचित होते की बी-२१ चा पहिला टप्पा २०२७चा असेल तर २०२९ पर्यंत हे पूर्णपणे कार्यरत होईल.

Web Title: America is getting an 'upgrade' Forget the B-2 bomber, the more dangerous B-21 jet is coming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.