१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:05 IST2025-06-22T19:04:10+5:302025-06-22T19:05:09+5:30

America attack on Iran: अमेरिकेच्या हल्ल्यापासून इराणला फसविण्यासाठी धोका देण्याची रणनिती देखील वापरण्यात आली. अमेरिकन मिलिटरीच्या काही निवडक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती, असे पेंटागॉनने म्हटले आहे.

America attack on Iran: 125 fighter jets, including 7 B2 bombers...! Iran was deceived, Pentagon told how nuclear plants were attacked... | १२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...

१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...

अमेरिकेने आज इराणच्या ३ अणुकेंद्रांवर जोरदार हल्ले चढवून ते नष्ट केले. फोर्डो, नतांज आणि इस्फहान या केंद्रांवर अमेरिकेने रविवारी सकाळी १२५ लढाऊ विमानांनी हल्ले केले. याच्या १३ तासांनंतर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रायलयाने या हल्ल्याची माहिती दिली आहे. 

जॉईंट चीफ ऑफ स्टाफ जनरल डॅन केन यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऑपरेशन मिडनाईट हॅमरमध्ये अमेरिकेची १२५ लढाऊ विमाने सहभागी झाली होती. यात सात बी२ बॉम्बर विमाने होती. या बॉम्बर विमानांनी दोन अणुकेंद्रांवर १४ बंकर बस्टर बॉम्ब डागले. तर इस्फहानवर टॉमहॉक मिसाईल डागण्यात आली. 

अमेरिकेच्या हल्ल्यापासून इराणला फसविण्यासाठी धोका देण्याची रणनिती देखील वापरण्यात आली. यासाठी काही बॉम्बवर्षाव करणारी विमाने प्रशांत महासागराकडे पाठविण्यात आली. इराणला वाटेल की हल्ला त्या दिशेने केला जाणार आहे, परंतू खरा हल्ला दुसऱ्याच दिशेने करण्यात आला, असेही केन म्हणाले. मिसौरी येथून सुरु करण्यात आलेले २००१ नंतरचे हे सर्वाधिक लांब पल्ल्याचे ऑपरेशन होते. याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. अमेरिकन मिलिटरीच्या काही निवडक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती, असे पेंटागॉनने म्हटले आहे. 

Web Title: America attack on Iran: 125 fighter jets, including 7 B2 bombers...! Iran was deceived, Pentagon told how nuclear plants were attacked...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.