रोड Accident नंतर घटनास्थळी पोहोचली अॅम्बुलन्स, ड्रायव्हरला आढळून आला मुलाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:48 IST2022-11-12T11:47:30+5:302022-11-12T11:48:15+5:30
Ambulance Driver Found His Son Dead: ही घटना इंडोनेशियातील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एक अपघात झाला आणि एका व्यक्तीने जवळच्या अॅम्बुलन्सला सूचित केलं की, त्यांनी लवकर घटनास्थळी पोहोचावं.

रोड Accident नंतर घटनास्थळी पोहोचली अॅम्बुलन्स, ड्रायव्हरला आढळून आला मुलाचा मृतदेह
Ambulance Driver Found His Son Dead: अनेकदा अशा काही घटना बघायला किंवा ऐकायला मिळतात, ज्यानंतर जीवन काय आहे आणि याचा अर्थ काय आहे याकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. एक अशीच घटना समोर आली आहे ज्यात एका मुलाचा मृतदेह त्याच्या बापासमोर पडला होता. या मुलाचा मृत्यू एका रोड अपघातात झाला होता.
मुलाची बाइक उभी होती
ही घटना इंडोनेशियातील एका शहरातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे एक अपघात झाला आणि एका व्यक्तीने जवळच्या अॅम्बुलन्सला सूचित केलं की, त्यांनी लवकर घटनास्थळी पोहोचावं. एक अॅम्बुलन्स ड्रायव्हर लगेच अॅम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचला. तो जसा तिथे पोहोचला समोर जे दिसलं ते पाहून त्याला धक्का बसला. तिथे त्याचा मुलाचा मृतदेह पडून होता.
ड्रायव्हर घटनास्थळी पोहोचताच तो लगेच गाडीतून खाली उतरला आणि अपघाताच्या ठिकाणी गेला. काही लोक मृतदेहाच्या आजूबाजूला उभे होते. जेव्हा अॅम्बुलन्सचा ड्रायव्हर तिथे पोहोचला तर त्याला दिसलं की, मृतदेह दुसऱ्या कुणाचा नसून त्याच्या मुलाचाच आहे. याचा अंदाज तुम्ही लावू शकता की, तेव्हा त्याच्या मनात काय सुरू असेल.
रिपोर्ट्सनुसार, हा अॅम्बुलन्स ड्रायव्हर इंडोनेशियातील एका मेडिकल संस्थेत ड्रायव्हरचं काम करतो. या ड्रायव्हरला 6 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता एका अपघाताची सूचना मिळाली होती. इमरजन्सी कॉलमुळे तो लगेच घटनास्थळी पोहोचला. ड्रायव्हर जेव्हा घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याने आपल्या मुलाची तिथे असलेली बाइक ओळखली. त्यानंतर मृतदेहाजवळ गेला.