इराणशी चर्चेसोबतच अमेरिकेने मध्य पूर्वेत घातला वेढा; ५० लढाऊ विमाने पाठवली, युद्धानौकाही रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 07:58 IST2026-02-18T07:56:56+5:302026-02-18T07:58:48+5:30
अमेरिकेच्या या सैन्य हालचाली अशा वेळी वाढल्यात जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे अणु कार्यक्रमावरून चर्चेचा दुसरा टप्पा सुरू आहे.

इराणशी चर्चेसोबतच अमेरिकेने मध्य पूर्वेत घातला वेढा; ५० लढाऊ विमाने पाठवली, युद्धानौकाही रवाना
वॉश्गिंटन - अमेरिकेने मध्य पूर्वेतील त्यांच्या सैन्य हालचालीत अचानक वाढ केली आहे. गेल्या २४ तासांत ५० हून अधिक लढाऊ विमाने या भागात तैनात केली आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये त्यांच्या अणुकार्यक्रमावर नवीन राजनैतिक चर्चा सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र मध्य पूर्वेत हवाई आणि नौदलाची ताकद मजबूत करण्याच्या उद्देशाने सैन्य वाढवले आहे असं एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले.
डिपेंडेंट फ्लाइट ट्रॅकिंग डेटा आणि मिलिट्री एविएशन मोनिटर्सच्या माहितीनुसार, एफ २२, एफ ३५ आणि एफ १६ सारखी आधुनिक लढाऊ विमाने मध्य पूर्वेच्या दिशेने जाताना दिसली आहेत. त्याशिवाय अनेक हवाई इंधन भरणारे टँकरही पाठवण्यात आलेत. ज्यातून अमेरिकन सैन्य दीर्घ काळ सैन्य अभियान राबवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे इराणसोबत झालेल्या ताज्या चर्चेनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स म्हणाले की, इराण अद्यापही राष्ट्रपती ट्रम्प यांच्याकडून दिलेल्या महत्त्वाच्या अटी स्वीकारण्यास तयार झाला नाही. ट्रम्प यांनी काही रेड लाइन्स निश्चित केल्यात, ज्या इराणने अजूनही स्वीकारल्या नाहीत असं त्यांनी विधान केले.
BREAKING:
— Commentary: Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) February 17, 2026
🇺🇸🇮🇷 Over 50 U.S. fighter jets, including F-35s, F-22s, and F-16s, have been sent to the Middle East within 24 hours. pic.twitter.com/2GsoPaYBWj
अमेरिकेच्या या सैन्य हालचाली अशा वेळी वाढल्यात जेव्हा अमेरिका आणि इराण यांच्यात स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे अणु कार्यक्रमावरून चर्चेचा दुसरा टप्पा सुरू आहे. या दोन्ही देशांमध्ये काही सकारात्मक चर्चा झाली आहे परंतु अद्यापही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा बाकी आहे. अमेरिकन राष्ट्रपतींचे विशेष दूत जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांनी इराण प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आहे. येत्या २ आठवड्यात ते नवीन प्रस्ताव घेऊन परतू शकतात. हा प्रस्ताव दोन्ही देशांमधील सध्याचा तणाव कमी करण्याच्या दिशेने असू शकतो असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, मागील बैठकांच्या तुलनेने यंदाच्या बैठकीत चांगली वाटचाल सुरू आहे. आता पुढे जाण्याचा मार्ग अधिक स्पष्ट दिसत आहे. परंतु दोन्ही देशांत तोडगा लवकर निघण्याची शक्यता नाही असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करणारे ओमानचे परराष्ट्र मंत्री अलबुसैदी यांनी बैठक सकारात्मक झाली, दोन्ही बाजूकडून तांत्रिक मुद्द्यांवर योग्य चर्चा सुरू आहे अशी माहिती दिली.
🚨 BREAKING:
🇺🇸🇮🇷 Multiple reports say the USS Gerald R. Ford has been officially deployed to the Middle East.
However, the deployment has not yet been independently confirmed.
Yesterday, the U.S. aircraft carrier entered the Strait of Gibraltar.pic.twitter.com/9JYMavoILrhttps://t.co/pmG8z9yGfu— Mario Nawfal (@MarioNawfal) February 17, 2026
हवाई क्षेत्रासोबतच अमेरिकेने नौदलाची ताकद वाढवली
सैन्य हालचालीत अमेरिकेने त्यांची विमानवाहू नौकाही मध्य पूर्वेच्या दिशेने रवाना केली आहे. ही युद्धनौका कॅरेबियनहून निघून अटलांटिक महासागरातील मध्यभागी पोहचली आहे. लवकरच ती आणखी पुढे जाईल असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं. याआधीही अमेरिकेने या प्रदेशात अनेक मोठ्या नौदल आणि हवाई लष्करी संसाधने तैनात केली आहेत.