लंडन - भारतातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्ल्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे. भारतातून फरार झाल्यापासून माल्ल्या हा इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. तसेच माल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.लंडनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना माल्ल्या म्हणाला की," मी पुन्हा एकदा सांगतो माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. आता मला अजून काही सांगायचे नाही."मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय माल्ल्याला स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्याची सहा लाख 50 हजार पौंड्सच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. माल्याने विविध बँकांचे सुमारे नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवल्याचा आरोप आहे.
माझ्याविरोधातील आरोप खोटे आणि निराधार - विजय माल्ल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:19 IST