इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 23:10 IST2026-04-06T23:05:14+5:302026-04-06T23:10:16+5:30
इराणने केलेल्या हवाई हल्ल्यांना इस्रायलकडून उत्तर देण्यात आले. इराणचा सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचे फोटो, व्हिडीओही समोर आले आहेत.

इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प धमक्यांपर्यंत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे इस्रायलचेइराणवरील हल्ले सुरूच आहेत. इस्रायलच्या लष्कराने इराणच्या पेट्रोकेमिकल प्लांटवरच हल्ला केला. इस्रायलचे संरक्षण मंत्री कात्ज यांनीच असा दावा केला आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले आहेत.
कात्ज यांनी म्हटले आहे की, इराणमधील पेट्रोकेमिकल फॅसिलिटीवर हल्ला केला आहे. आम्ही आमच्या लष्कराला सांगितले आहे की, इराणच्या पायाभूत प्रकल्पांवर पूर्ण ताकदीने हल्ले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Israel has carried out a severe attack on Iran's largest gas processing and petrochemical center in Asaluyeh, which is based on the South Pars gas field (shared with Qatar).
— Terror Alerts (@Terroralerts007) April 6, 2026
This is the world's largest natural gas field, and Israel has now attacked it for the second time. pic.twitter.com/psufGb1BFk
प्लांटमध्ये निम्मे तेल उत्पादन
कात्ज यांनी सांगितले की, "आयडीएफने आता इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल फॅसिलिटीवर जोरदार हल्ला केला आहे. हे असालुयेह येथे आहे. या प्लांटमध्ये इराणमधील अर्धे पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन होते."
BREAKING: The Israeli Defense Forces say they have struck the largest petrochemical facility in Asaluyeh, southern Iran, linked to the South Pars gas field.
— OSINT News (@OSINTNewsqrb) April 6, 2026
The strike follows earlier attacks in Asaluyeh that targeted a separate facility. Around 80% of Iran’s electricity grid is… pic.twitter.com/tIPS3Ep0xC
मागील आठवड्यात इस्रायलने इराणच्या एका पेट्रोकेमिकल प्लांटवर हल्ला केला होता. पेट्रोकेमिकल प्लांटवर हल्ला करण्याची ही दुसरी घटना घटना आहे. "या दोन्ही पेट्रोकेमिकल्स प्लांटमध्ये इराणचे ८५ टक्के पेट्रोकेमिकल निर्यात होते. आता ते काम करण्याच्या स्थितीत नाहीत", असा दावा कात्ज यांनी केला आहे.
"इराणच्या सरकारसाठी हा अरबो करोडो रुपयांचा आर्थिक झटका आहे. पेट्रोकेमिकल उद्योग रिव्हॉल्युशनरी गार्डच्या कारवायांसाठी दिला जाणारा निधी आणि इराणच्या लष्कराची ताकत वाढवण्यात महत्त्वाचा ठरतो", असेही इस्रायलने म्हटले आहे.
इराणी माध्यमांमध्ये काय?
इराणची निम सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या तस्नीमने दोन हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. इराणच्या दोन पेट्रोकेमिकल प्लांटवर हल्ले झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
इराणची साऊथ पार्स गॅस फील्ड जगातील सर्वात मोठी नैसर्गिक वायू ठिकाण आहे. फार्स न्यूज एजन्सीने म्हटले आहे की, या हल्ल्यामुळे मोठी आग लागली होती. ती काही काळात आटोक्यात आणण्यात आली.
...म्हणून मी अर्वाच्य शब्द वापरले - ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्याबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर ट्रम्प म्हणाले की, "मला फक्त माझं म्हणणं मांडायचं होतं. मला वाटतं तुम्ही असे यापूर्वीही ऐकलेलं असेल."
सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ट्रम्प यांनी संवाद साधताना ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टबद्दल भाष्य केले.