१३३ प्रवासी असलेले एअर इंडिया विमान थोडक्यात वाचलं! धावपट्टीवर उतरत असताना समोरचे चाक निघाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 14:19 IST2026-03-11T14:17:59+5:302026-03-11T14:19:13+5:30
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आणि ११३ प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. हैदराबादहून निघालेले हे विमान थायलंडमध्ये उतरत होते.

१३३ प्रवासी असलेले एअर इंडिया विमान थोडक्यात वाचलं! धावपट्टीवर उतरत असताना समोरचे चाक निघाले
१३३ प्रवाशांना घेऊन हैदराबादवरून उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाचा मोठा अपघात टळला. विमान थायलंडमधील फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना समोरील चाक निखळून पडले. त्यामुळे विमान धावपट्टीवर जोरात आदळले आणि फसले. बुधवारी (११ मार्च) ही घटना घडली. आता अनेक तासांसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस IX938 या विमानाने हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले होते. थायलंडमधील फुकेतमध्ये बुधवारी ते पोहोचले. १३३ प्रवासी असलेले हे विमानतळावर उतरणार होते. त्याचवेळी विमानाचे नाकाजवळी एक चाक निखळून पडले.
विमान प्राधिकरण अधिकाऱ्यानी सांगितले की, यात कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद करण्यात आली आहे.
HARD LANDING grounds Phuket Airport & closes runway
— RT (@RT_com) March 11, 2026
Air India Express seen in a ROUGH touch down 'suffered nose wheel issue' — reports pic.twitter.com/fbTkXMxVme
हे विमान बुधवारी सकाळी ११.४० वाजता पोहचणार होते. पण, ते ११.२४ वाजता पोहोचले. हार्ड लँडिंग झाल्यामुळे विमानतळ अधिकाऱ्यांनी पाहणी केली, तेव्हा समोरील चाक निखळल्याचे आढळून आले. विमानात दोन लहान मुले आणि सात क्रू मेंबर्स होते.
फुकेत विमानतळ प्रशासनाने ही धावपट्टी काही काळासाठी बंद करण्याच्या सूचना दिल्या. दुपारी १२.०८ पासून ते सायंकाळी ६.०० पर्यंत धावपट्टीवरील विमान बाजूला करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर धावपट्टीची पाहणी आणि दुरूस्तीही केली जाणार आहे.
या घटनेमुळे फुकेत विमानतळावर लँडिंगसाठी काही विमानांना प्रतिक्षा करावी लागली. तर काही विमाने दुसरीकडे वळवण्यात आली. वळवण्यात आलेली विमाने करबी, सूरत थानी या फुकेतपासून जवळ असलेल्या विमानतळांवर उतरवण्यात आली.