एड्सचा विळखा, गरिबीचा डोंगर; पण 'या' देशाच्या राजाचा थाटच न्यारा! १५ पत्नी आणि फौजेसह परदेशवारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:11 IST2026-02-20T14:10:32+5:302026-02-20T14:11:58+5:30

एकीकडे 'या' देशाच्या राजाचा शाही थाट जगाचे लक्ष वेधून घेत असताना, दुसरीकडे त्यांच्या देशातील भीषण गरिबी आणि एड्सच्या संकटामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

AIDS epidemic, mountains of poverty; but the king of 'this' country is just as proud! Traveling abroad with 15 wives and an army! | एड्सचा विळखा, गरिबीचा डोंगर; पण 'या' देशाच्या राजाचा थाटच न्यारा! १५ पत्नी आणि फौजेसह परदेशवारी!

एड्सचा विळखा, गरिबीचा डोंगर; पण 'या' देशाच्या राजाचा थाटच न्यारा! १५ पत्नी आणि फौजेसह परदेशवारी!

आफ्रिकेतील एका छोट्याशा देशाच्या राजाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'एस्वातिनी' या देशाचे राजे म्स्वाती तृतीय आपल्या १५ पत्नी, मुले आणि डझनभर अंगरक्षकांच्या ताफ्यासह संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर पोहोचले होते. एकीकडे त्यांचा हा शाही थाट जगाचे लक्ष वेधून घेत असताना, दुसरीकडे त्यांच्या देशातील भीषण गरिबी आणि एड्सच्या संकटामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

१८ व्या वर्षी हाती आली सत्ता

म्स्वाती तृतीय हे अवघ्या १८ व्या वर्षी १९८६ मध्ये एस्वातिनीच्या गादीवर बसले होते. आफ्रिकेतील शेवटची 'पूर्ण राजेशाही' असलेल्या या देशात राजाकडेच सर्व राजकीय आणि न्यायालयीन अधिकार आहेत. विशेष म्हणजे, परदेश दौऱ्यावर जाताना अनेकदा ते त्यांच्या पारंपारिक वेशभूषेत आणि चप्पलांमध्ये दिसतात, मात्र त्यांचा ताफा एखाद्या महासत्तेच्या प्रमुखापेक्षाही मोठा असतो.

एड्स आणि गरिबीचा विळखा

ज्या देशाचा राजा इतक्या ऐषारामात राहतो, त्याच एस्वातिनीची खरी परिस्थिती अत्यंत भयावह आहे. जगातील सर्वाधिक एचआयव्ही/एड्स ग्रस्त देशांच्या यादीत हा देश वरच्या क्रमांकावर आहे. देशातील मोठ्या लोकसंख्येला आजही पिण्याचे शुद्ध पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. बेरोजगारी आणि उपासमारीने जनता होरपळत असताना राजाच्या १५ पत्नींचा हा लवाजमा पाहून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे.

जुना व्हिडिओ पुन्हा चर्चेत

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ २०२२ मधील आहे, जेव्हा राजा म्स्वाती आर्थिक सहकार्यासाठी दुबईला गेले होते. त्याकाळी स्थानिक माध्यमांनी याला मोठी राजनैतिक भेट म्हटले होते. मात्र, आता हा व्हिडिओ पुन्हा समोर आल्यानंतर लोक विचारत आहेत की, ज्या देशातील जनता औषधांविना मरत आहे, तिथला राजा इतका अफाट खर्च कसा काय करू शकतो?

शाही जीवनशैली की प्रदर्शनी?

व्हिडिओमध्ये राजा म्स्वाती आपल्या खासगी विमानातून खाली उतरताना दिसत आहेत. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नींची लांबलचक रांग आणि नोकरचाकर दिसत आहेत. डिजिटल युगात हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने एस्वातिनीमधील आर्थिक असमानतेची चर्चा आता जागतिक स्तरावर रंगली आहे.

Web Title : एड्स और गरीबी के बीच एस्वातिनी के राजा का शाही ठाठ-बाट

Web Summary : एस्वातिनी के राजा म्स्वाती तृतीय का 15 पत्नियों संग शाही जीवन गरीबी और एड्स संकट के बीच है। अमीरात की यात्रा पर शाही ठाठ-बाट ने आलोचना बटोरी, आर्थिक असमानता उजागर हुई, जहाँ नागरिकों को मूलभूत सुविधाएँ भी नहीं हैं।

Web Title : Eswatini's King's Lavish Lifestyle Amidst Poverty and AIDS Crisis Sparks Outrage

Web Summary : King Mswati III's opulent lifestyle with 15 wives contrasts sharply with Eswatini's poverty and AIDS crisis. His UAE trip with a large entourage sparked criticism, highlighting economic disparities as citizens lack basic necessities while the king lives lavishly.