aggressive russia china making deadly weapons nato countries in panic | आक्रमक चीन अन् रशिया तयार करतायत घातक शस्त्र; नाटो देश दहशतीखाली

आक्रमक चीन अन् रशिया तयार करतायत घातक शस्त्र; नाटो देश दहशतीखाली

लंडनः रशियाची सतत आक्रमक वृत्ती आणि चीनच्या संरक्षण सज्जतेमुळे नाटो देशात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. रशियाच्या आक्रमक भूमिकेविरुद्ध आपली तयारी अधिक बळकट करण्याची विनंती नाटो देशांना करण्यात आली आहे.  फ्रान्स, बेल्जियम, लक्जमर्ग, ब्रिटन, नेदरलँड, कनाडा, डेन्मॉर्क, आइसलँड, इटली, नार्वे, पोर्तुगाल आणि संयुक्त राज्य अमेरिका या देशांचा नाटोमध्ये समावेश आहे. रशियाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी नाटो देशांना स्मार्ट, वेगवान, सामूहिक आणि जोरदार कारवाईची आवश्यकता असल्याचा इशाराही एका पॉलिसी पेपरमधून देण्यात आला आहे. 

किंग्ज कॉलेज लंडनच्या या पॉलिसी पेपरमध्ये असे म्हटले आहे की, सायबर हल्ले, जैविक शस्त्रे आणि रशियाकडून नाटो देशांना दगाफटका होण्याचा धोका आहे. सर्गेई स्क्रिपाल आणि त्यांची मुलगी यूलिया यांना विष देऊन हत्या केली होती. त्याच वेळी निवडणुकांमध्ये रशियन हस्तक्षेपाचा धोका वाढला आहे.

चीनला पाश्चात्य देशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे
नाटो देशांना चीनशी संघर्ष टाळण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. चीनने हाँगकाँगवर कडक कायदे लादले आहेत. चीनला आता पाश्चात्य देशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे. माजी संरक्षण सचिव लॉड रॉबर्टसन म्हणाले की, अत्यंत आक्रमक चीन आणि रशिया नवीन धोके निर्माण करीत आहेत. अशा परिस्थितीत नाटोला या अधिक शक्तिशाली होऊन पूर्ण तयारी करण्याची गरज आहे. पेपरात असे म्हटले आहे की, रशिया हा नेहमीच नाटोचा 'शत्रू' राहिला आहे, परंतु चीनचा नवा उदय आणि वाढत्या लष्करी सामर्थ्याने 21व्या शतकात नवीन चिंतांना जन्म दिला आहे. चीन आपला संरक्षण खर्च 6.6 टक्क्यांनी वाढवणार आहे. चीनचे अध्यक्ष सन 2035पर्यंत चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात गुंतले आहेत. सन 2049 पर्यंत चीनच्या सैन्याला जागतिक दर्जाचे बनविण्याची त्यांची योजना आहे. चीन आणि भारत, जपान यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ड्रॅगन हिमालयातून दक्षिण चीन समुद्राकडे सरकला असून, तैवान, व्हिएतनामसारख्या छोट्या शेजारील देशांना वारंवार धमकावत आहे. 

हेही वाचा

आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल; मोदी सरकार 20 जुलैला नवा कायदा लागू करणार

विकृती... हॉस्पिटलच्या फ्री WiFi वरून डाऊनलोड केले 80,000 'चाईल्ड पॉर्न'; तुरुंगात रवानगी

बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

Breaking : महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर; ९० टक्क्यांचा टप्पा पार, मुलांपेक्षा मुली हुश्शार!

मोठी बातमी! 'या' बँकांनी मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: aggressive russia china making deadly weapons nato countries in panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.