भारतासोबतच्या ट्रेड डीलनंतर, अमेरिकेनं जारी केला नकाशा; पाकिस्तान, चीनचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 22:58 IST2026-02-07T22:56:38+5:302026-02-07T22:58:15+5:30

us india trade deal new map released showed pok and aksai chin as part of india

After trade deal with India US releases map Tensions between Pakistan and China increased | भारतासोबतच्या ट्रेड डीलनंतर, अमेरिकेनं जारी केला नकाशा; पाकिस्तान, चीनचं टेन्शन वाढवलं!

भारतासोबतच्या ट्रेड डीलनंतर, अमेरिकेनं जारी केला नकाशा; पाकिस्तान, चीनचं टेन्शन वाढवलं!

भारत-अमेरिका व्यापार कराराबरोबरच एका नकाशाने संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने भारताचा एक नवा नकाशा प्रसिद्ध केला आहे. ज्याने, पाकिस्तान आणि चीन दोघांचेही टेन्शन वाढले असणार. कारण या नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीर, पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) आणि अक्साई चिन भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहेत.

पाकिस्तानसाठी मोठा धक्का - 
खरे तर, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. यासाठी आम्हाला परकीय मंजुरीची गरज नाही, असे भारताने अनेक वेळा म्हटले आहे. मात्र असे असले तरी, अमेरिकेने असा नकाशा प्रसिद्ध करणे हा पाकिस्तानसाठी एक मोठा राजकीय आणि राजनैतिक धक्का असल्याचे बोलले जात आहे. आजवर पाकिसतान नाराज होऊ नये, म्हणून अमेरिकेने पीओकेसंदर्भात अत्यंत संतुलित भूमिका ठेवली आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने जारी केलेला हा नवा नकाशा पाकिस्तानच्या दाव्यांना सुरुंग लावणारा आहे. 

चीनलाही धक्का - 
महत्वाची गोष्ट म्हणजे, या नकाशात अमेरिकेने चीनच्या ताब्यातील अक्साई चिनहीदर्शवला आहे. तत्पूर्वी, भारताने अनेक वेळा परदेशी संस्थांनी जारी केलेल्या चुकीच्या नकाशांवर आक्षेप घेतला होता. मात्र, ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या या नकाशाकडे, भारताच्या आक्षेपांना मिळालेली ही मोठी पावती म्हणून बघिते जात आहे. 

यासंदर्भात बोलताना, निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, हे अमेरिकेचे एक उत्तम पाऊल आहे. इतर अनेक जण म्हणतात की हे पाकिस्तानच्या अलिकडच्या राजनैतिक प्रयत्नांना हा मोठा धक्का आहे.

व्यापार कराराचा भारताला फायदा -
केवळ नकाशाच नव्हे, तर व्यापारातही भारताला मोठा फायदा झाला आहे. ट्रम्प सरकारने भारतीय वस्तूंवरील ५० टक्के कर आता १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. यामुळे लोखंड, औषधे आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भारतीय निर्यातीला मोठी बळकटी मिळेल. महत्वाचे म्हणजे, भारताने आपल्या शेतकऱ्यांचे आणि दुग्धव्यवसायातील हित जप हा मोठा करार केला आहे.

Web Title: After trade deal with India US releases map Tensions between Pakistan and China increased