विमानात बिघाड? ‘डिटॅचेबल केबिन सिस्टीम’ने अख्खी प्रवासी केबिनच पॅराशूटने येणार जमिनीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:02 IST2025-06-22T14:00:46+5:302025-06-22T14:02:45+5:30
युक्रेनियन एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांची २०१६ मध्ये मांडलेली कल्पना पुन्हा चर्चेत

विमानात बिघाड? ‘डिटॅचेबल केबिन सिस्टीम’ने अख्खी प्रवासी केबिनच पॅराशूटने येणार जमिनीवर
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघातानंतर विमान सुरक्षेवरील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चर्चेत युक्रेनियन एरोस्पेस अभियंता तातारेन्को व्लादिमीर निकोलाविच यांची २०१६ मध्ये मांडलेली कल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांनी अशा विमानाची रचना सादर केली होती, ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण प्रवासी-केबिन मुख्य विमानापासून वेगळे होऊ शकते आणि पॅराशूटद्वारे सुरक्षितपणे जमिनीवर उतरू शकते.
प्रवाशांचा कल्पनेला पाठिंबा
एका सर्वेक्षणात, ९५% प्रवाशांनी म्हटले की जर अशी तंत्रज्ञान उपलब्ध असेल तर ते जास्त पैसे देऊनही तिकीट खरेदी करण्यास प्राधान्य देतील. ही रचना प्रत्यक्षात उतरणार की नाही हे जरी अद्याप निश्चित नाही.
हलक्या वजनाच्या साहित्याचा वापर
केव्हलर आणि कार्बन फायबर सारखे हलके पण खूप मजबूत असणारे साहित्य या डिझाइनमध्ये वापरले जाईल. यामुळे केबिन मजबूत तर होतेच, पण विमानाच्या एकूण उड्डाण क्षमतेवरही परिणाम होत नाही.
उड्डाणाच्या कोणत्याही टप्प्यावर वेगळे होणार?
‘डिटेचेबल केबिन सिस्टीम’ची सर्वांत खास गोष्ट म्हणजे ती विमान प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर म्हणजेच टेकऑफ, मिड-फ्लाइट किंवा लँडिंगच्या वेळीही वेगळी होऊ शकते. विमानापासून वेगळे होताच, मोठे पॅराशूट उघडतील व ते हळूहळू खाली येईल. लँडिंग पाण्यात असल्यास तरंगण्यास मदत होईल अशी रचना.
विमान उद्योग काय म्हणतो?
विमानाचे वेगळे केलेले केबिन कुठे पडेल? पर्वत, इमारती किंवा जंगलात लँडिंग धोकादायक असू शकते.