अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेकडून थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर खामेनी पुन्हा एकदा भूमिगत झाले असून त्यांनी गुप्त बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. गेल्या सात महिन्यांतील ही दुसरी वेळ असून, इराणमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांची अवस्था कासिम सुलेमानी किंवा बगदादीसारखी करण्याची गर्भित धमकी दिली आहे. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी सतर्क होत खामेनी यांना तेहरानजवळील एका सुरक्षित बंकरमध्ये हलवले आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान यांनीही सोशल मीडियावर इशारा दिला की, "खामेनी यांच्यावरील कोणताही हल्ला म्हणजे संपूर्ण इराणविरुद्ध युद्ध मानले जाईल."
व्हेनेझुएलाच्या घटनेने इराण घाबरला?
इराणच्या या भीतीमागे एक मोठे कारण म्हणजे ३ जानेवारी २०२६ रोजी झालेली अमेरिकेची धडक कारवाई. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले असून ते सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. "जर अमेरिका एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलून नेऊ शकते, तर आपणही सुरक्षित नाही," अशी भावना इराणच्या सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
अमेरिकेची मोठी घेराबंदी
इराणला चहुबाजूंनी घेरण्यासाठी अमेरिकेने आपली युद्धनौका 'यूएसएस अब्राहम लिंकन' मलक्का सामुद्रधुनी ओलांडून इराणच्या दिशेने रवाना केली आहे. तसेच जॉर्डनमध्ये १२ एफ-१५ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. १७ जानेवारी रोजी खामेनी शेवटचे सार्वजनिकरित्या दिसले होते, तेव्हा त्यांनी अमेरिकेला 'सैतान' म्हणत जोरदार टीका केली होती.
बंकरमध्ये नक्की काय आहे?
अयातुल्ला अली खामेनी ज्या बंकरमध्ये लपले आहेत, तो ईशान्य तेहरानमधील 'लविझान' भागात असल्याचे मानले जाते. या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि मुलगा मोजताबा खामेनी असल्याचे म्हटले जात आहे. जून २०२५ मध्येही जेव्हा इस्रायलने इराणवर हल्ले केले होते, तेव्हा खामेनी २१ दिवस याच ठिकाणी लपून बसले होते.
Web Summary : Amidst escalating US-Iran tensions, Ayatollah Khamenei has reportedly retreated to a bunker following threats, reminiscent of Venezuela's Maduro's abduction. Fears rise within Iranian leadership due to perceived American aggression, including naval deployments and potential attacks, mirroring past Israeli actions. Khamenei's location is believed to be in northeast Tehran.
Web Summary : अमेरिकी-ईरान तनाव के बीच, अयातुल्ला खमेनी कथित तौर पर वेनेजुएला के मादुरो के अपहरण की याद दिलाते हुए, खतरों के बाद एक बंकर में चले गए। ईरानी नेतृत्व में अमेरिकी आक्रामकता के कारण भय बढ़ रहा है, जिसमें नौसैनिक तैनाती और संभावित हमले शामिल हैं, जो पिछली इजरायली कार्रवाइयों को दर्शाते हैं। खमेनी का ठिकाना उत्तर-पूर्व तेहरान में माना जाता है।