HMPV नंतर चीनमध्ये आता Mpox व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्याने हाहाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:11 IST2025-01-09T19:10:21+5:302025-01-09T19:11:32+5:30

चीनमध्ये HMPV व्हायरसमुळे आधीच चिंता वाढलेली असताना आता एका नवीन व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे.

after hmpv virus china found cluster of new mpox strain | HMPV नंतर चीनमध्ये आता Mpox व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्याने हाहाकार

HMPV नंतर चीनमध्ये आता Mpox व्हायरसचा नवा स्ट्रेन मिळाल्याने हाहाकार

चीनमध्ये HMPV व्हायरसमुळे आधीच चिंता वाढलेली असताना आता एका नवीन व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं की त्यांना एमपॉक्स एक नवीन स्ट्रेन क्लेड आयबी आढळला आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केल्यानंतर हा व्हायरल संसर्ग अनेक देशांमध्ये पसरत आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने म्हटलं आहे की, मंकीपॉक्सचा क्लेड १बी काँगोसह काही आफ्रिकन देशांमध्ये आधीच अस्तित्वात आहे आणि परदेशी व्यक्तीला संसर्ग झाल्यानंतर येथून त्याची सुरुवात झाली. परदेशी नागरिकाच्या संपर्कात आल्यानंतर आणखी चार नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. रुग्णांची लक्षणं सौम्य आहेत. त्यांच्या त्वचेवर पुरळ आणि फोड आहेत.

राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं आहे की, एमपॉक्स हा कॅटेगरी बी संसर्गजन्य रोग म्हणून मॅनेज केला जाईल. अधिकारी आपत्कालीन उपाययोजना करू शकतील. जसं की गर्दी रोखणं, काम आणि शाळा बंद करणं आणि रोग पसरल्यावर परिसर सील करणं. चीनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये म्हटलं होतं की, ते देशात एन्ट्री करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवतील.

एमपॉक्स कसा पसरतो?

एमपॉक्स संपर्कातून पसरतो. त्यामुळे शरीरावर फ्लूसारखी लक्षणं दिसतात आणि पूरळ, फो़ड येतात. जरी एमपॉक्स सहसा प्राणघातक नसला तरी काही वेळा तो  प्राणघातक ठरू शकतो. गेल्या ऑगस्टमध्ये, WHO ने गेल्या दोन वर्षांत दुसऱ्यांदा एमपॉक्सला ग्लोबल पब्लिक हेल्थ इमर्जन्सी म्हणून घोषित केलं. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं.
 

Web Title: after hmpv virus china found cluster of new mpox strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.