एक हजार वर्षांनंतर चीनमध्ये पुराचं भयंकर थैमान; लोक म्हणतायत- जगात कोरोना पसरवला, त्याचाच परिणाम...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:33 PM2021-07-22T14:33:29+5:302021-07-22T14:40:42+5:30

म्हटले जाते, की चीनमध्ये गेल्या एक हजार वर्षांनंतर एवढा प्रचंड पाऊस होत आहे (Heavy Rain In China). एवढ्या वर्षांत, असा पाऊस चीनवर कधीही कोसळला नव्हता.

After 1 thousand years the flood caused havoc in China people said its punishment | एक हजार वर्षांनंतर चीनमध्ये पुराचं भयंकर थैमान; लोक म्हणतायत- जगात कोरोना पसरवला, त्याचाच परिणाम...!

एक हजार वर्षांनंतर चीनमध्ये पुराचं भयंकर थैमान; लोक म्हणतायत- जगात कोरोना पसरवला, त्याचाच परिणाम...!

Next


जगातील आजच्या कोरोना परिस्थितीला चीनच जबाबदार असल्याचे मानले जाते. वुहानच्या मीट मार्केट (Wuhan Flesh Market)मध्ये विकल्या जाणाऱ्या वटवाघळांच्या मांसापासून कोरोना पसरला अथवा येथील लॅबमध्ये व्हायरस तयार करून पसरवला गेला. मात्र, याला जबाबदार चीनच आहे, असे म्हटले जाते. मात्र, चीनने कधीही याची जबाबदारी घेतलेली नाही. पण म्हणतातना, की देव सर्व पाहत असतो! चीनच्या कृत्याने त्रस्त होऊन भलेही जगातील इतर देशांना काही करता आले नसेल, पण या देशाला त्याच्या वाईट कृत्यांची शिक्षा देव देत आहे, असे म्हटले जात आहे. (After 1 thousand years the flood caused havoc in China people said its punishment)

म्हटले जाते, की चीनमध्ये गेल्या एक हजार वर्षांनंतर एवढा प्रचंड पाऊस होत आहे (Heavy Rain In China). एवढ्या वर्षांत, असा पाऊस चीनवर कधीही कोसळला नव्हता. या पावसामुळे चीनमधील बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत. देशात पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्लूमबर्ग न्यूज एजन्सीच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे, की आतापर्यंत या पावसामुळे तेथे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. खालच्या भागांत पुराचे पाणी भरले आहे. तसेच अनेक ठिकाणी गळ्यापर्यंत पाणी आले आहे.

रेल्वेंमध्ये पाणी -
आज चीनमध्ये पुराची जी स्थिती निर्माण झाली आहे. तशी स्थिती गेल्या एक हजार वर्षांत कधीही पाहिली गेली नाही. चीनमधून समोर आलेल्या काही फोटोंमध्ये तेथील पॅसेंजर ट्रेन्समध्ये गळ्यापर्यंत पाणी भरल्याचे दिसते. अनेक जण पावसात अडकले आहेत. या लोकांना काढण्यासाठी सैन्याला बोलावण्यात आले आहे. रस्त्यांवरही गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

सरकारची चिंता वाढली - 
येते शनिवारपासूनच सातत्याने पाऊस होत आहे. आतापर्यंत चीनच्या झेंगझोऊमध्ये विक्रमी 617 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा तीन दिवसांचा आहे. तर येथे वर्षभरात 640 मिली मीटर पावसाची नोंद होते. पावसाची स्थिती पाहता येथे अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

चीनमधील पावसाच्या थैमानाचे फोटो सोशल मिडियावरही व्हायरल होत आहेत. यावर अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी ही चीनच्या दुष्कृत्यांची शिक्षा असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी म्हटले आहे, की जगाचा विनाश करून चीन शांततेत होता. ही चीनवर पडलेली देवाची काठी आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: After 1 thousand years the flood caused havoc in China people said its punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app