शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 14:29 IST

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन.

ठळक मुद्देअफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश.तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह बहुतांश भागावर रविवारी तालिबाननं कब्जा केला. अशाच परस्थितीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील नागरिक तालिबानच्या भीतीनं अन्य देशांमध्ये शरण घेण्यास जात आहे. परंतु अशा परिस्थितीत अशरफ गनी यांच्या देश सोडल्यानं अनेक नागरिक नाराज झाले आहे. भारतात आलेल्या एका अफगाण विद्यार्थ्यांनही यानंतर आपलं दु:ख व्यक्त केलं. 

"राष्ट्राध्यक्ष अशरफ गमी अशा वेळी देश सोडून गेले, हे अतिशय बेजबाबदार पणाचं वर्तन आहे. त्यांच्या या कृत्यामुळे प्रत्येक अफगाणी नागरिकाला दु:ख झालं आहे. आम्हाला त्यांच्याकडून अनेक अपेक्षा होत्या," असं विद्यार्थ्यांनं सांगितलं. लोकांसोबत गद्दारी"जेव्हा मी त्या ठिकाणाहून पळालो आहे तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती काय आहे हे समजू शकता. अशरफ गनी याची टीम गद्दार आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत," अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी खासदार जमील करझई यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर दिली. 

"अफगाणिस्तानच्या बहुतांश भागात शांतता आहे. जवळपास अनेक राजकीय लोकांनी काबुल सोडलं. २०० जण दिल्लीला आले आहेत. मला असं वाटतंय हे नवं तालिबान आहे. ते महिलांनादेखील काम करण्याची परवानगी देतील,"अशी प्रतिक्रिया अफगाण राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार रिझवानुल्ला अहमदझई यांनी दिल्लीला आल्यानंतर दिली.

तालिबान आम्हालाही मारू शकतो"जगानं अफगाणिस्तानला वेगळं सोडलं यावर विश्वास बसत नाही. त्या ठिकाणी आमचा मित्रपरिवार आहे, त्याचा खून होऊ शकतो. तालिबान आम्हालाही मारू शकते. आमच्या महिलांना आथा त्या ठिकाणी अधिक अधिकार मिळणार नाही," अशी प्रतिक्रिया भारतात आलेल्या एका महिलेनं दिली. 

गनी यांची भावूक पोस्ट"माझ्यासमोर आव्हानात्मक पर्याय होते. मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभे ठाकायला हवे. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी गेली २० वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरे जावे लागले असते. तालिबानने मला हटवले आहे. काबुलमधील सामान्य जनतेवर हल्ले करण्यासाठी ते आले आहेत. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असं गनी यांनी म्हटलं आहे. 

काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असतं"मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल, असं घनी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानPresidentराष्ट्राध्यक्षStudentविद्यार्थीIndiaभारतdelhiदिल्लीAir Indiaएअर इंडिया