शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अफगाणिस्तानात पत्रकारांसोबत तालिबानची क्रूरता; आंदोलक महिलांनाही जबर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 11:18 IST

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली.

काबूल - तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यापासून तेथील जनता प्रचंड दहशतीखाली आहे. गेल्या काही दिवसांपासून काबूलसह विविध शहरांमध्ये तालिबान सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या आंदोलनाचे अथवा निदर्शनांचे नेतृत्व महिला करत आहेत. मात्र, तालिबान ही निदर्शने दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानने अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर, महिलांनी काबूलमध्ये विविध ठिकाणी निदर्शने केली आणि सरकारमध्ये वाटा मागितला आहे. (Afghanistan Taliban beats protesters in kabul women journalists  fighters)

खरे तर, महिलांचे हे निदर्शन फार छोटे होते, मात्र, या निदर्शनानेही तालिबान्यांना हादरा दिला आहे. तालिबानची  झोप उडवली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी महिलांना मारहाण केली. एवढेच नाही, तर तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. आता सरकारच्या स्थापनेनंतर लगेचच, परवानगीशिवाय कुणालाही कुठल्याही प्रकारचे निदर्शन करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे.

चीनची मोठी खेळी! नव्या तालिबान सरकारसाठी ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली.

तालिबानने सत्ता बळकावल्यानंतर, महिलांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. आता तेथे मुले आणि मुली शाळा तथा महाविद्यालयांमध्ये एकत्रपणे शिकू शकत नाहीत. याशिवाय त्यांनी काय परिधान करावे काय करू नये, यावरही बंधने घालण्यात आली आहेत. तेथे महिलांना आता बाहेर काही कामही करू शकत नाहीत. यापूर्वी आपण आपल्या सरकारमध्ये महिलांनाही वाटा देऊ, असे तालिबानने म्हटले होते.

मुस्लिमांविरोधात आग ओकणारे 'बौद्ध भिक्षू' विराथू यांची कारागृहातून सुटका; म्हटले जाते रोहिंग्यांचा कर्दनकाळ!

तत्पूर्वी, काबुल शिवाय, मजार-ए-शरीफ आणि इतर शहरांमध्येही गेल्या दोन-तीन दिवसांपासून निदर्शने तीव्र झाली आहेत. अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्येही अफगाणिस्तानच्या नागरिकांनी निदर्शने केली. अफगाण नागरिकांमध्ये तालिबान व्यतिरिक्त पाकिस्तानबद्दलही रोष आहे. पाकिस्तानी हवाई दलाने नकतेच पंजशीर परिसरात ड्रोन हल्ले केले होते.

टॅग्स :TalibanतालिबानWomenमहिलाTerrorismदहशतवादAfghanistanअफगाणिस्तानJournalistपत्रकार