Afghanistan: भारताने बांधलेल्या सलमा डॅमवर हल्ल्यासाठी तालिबानी आले; डाव उलटला, पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 03:55 PM2021-08-04T15:55:05+5:302021-08-04T15:55:53+5:30

Taliban attack in Afghanistan: 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद मोदी आणि अफगानिस्तानच्या राष्ट्रपतींनी याचे उद्घाटन केले होते. सलमा बंधारा म्हणजेच अफगानिस्तान-इंडिया फ्रेंडशिप डॅम असे त्याचे नाव होते. हा प्रकल्प 1700 कोटी रुपयांचा होता.

Afghanistan: Taliban attack on India-built Salma Dam 'failed' as result of Afghan forces counter-attack | Afghanistan: भारताने बांधलेल्या सलमा डॅमवर हल्ल्यासाठी तालिबानी आले; डाव उलटला, पळाले

Afghanistan: भारताने बांधलेल्या सलमा डॅमवर हल्ल्यासाठी तालिबानी आले; डाव उलटला, पळाले

googlenewsNext

अफगानिस्तानातील (Afghanistan) हेरात प्रांतात भारताने (India) निर्माण केलेल्या सलमा डॅमवर हल्ला (Salma Dam attack) करण्यासाठी आलेल्या तालिबान दहशतवाद्यांना (Taliban) मोठे नुकसान झेलावे लागले आहे. अफगान सरकारने म्हटले की, सैन्याने तालिबानचा हा हल्ला निष्पळ ठरविला आहे. तालिबानचे अनेक दहशतवादी या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. यामुळे त्यांनी या परिसरातून पळ काढला आहे. (Taliban try to attack on Salma Dam in Afghanistan; build by India.)

अफगानिस्तान संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी ट्विट करून सांगितले की, तालिबानच्या दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री भारत-अफगानिस्तान दोस्ती डॅम या नावाने प्रसिद्ध असलेला डॅम फोडण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या महिन्यातही तालिबानने या बंधाऱ्यावर रॉकेट डागले होते. परंतू हे रॉकेट बंधाऱ्यापासून थोडे लांब पडले होते. यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. हेरात मधील चेशते शरीफ जिल्ह्यात हा बंधारा आहे. अफगानिस्तानमधील सर्वात मोठ्या बंधाऱ्यांपैकी एक आहे. या डॅममुळे प्रांतातील हजारो कुटुंबांची शेती, वीज आणि पाण्याची गरज भागते. 

2016 मध्ये पंतप्रधान नरेंद मोदी आणि अफगानिस्तानच्या राष्ट्रपतींनी याचे उद्घाटन केले होते. सलमा बंधारा म्हणजेच अफगानिस्तान-इंडिया फ्रेंडशिप डॅम असे त्याचे नाव होते. हा प्रकल्प 1700 कोटी रुपयांचा होता. हेरात प्रांतात रणनितीसाठी हा महत्वाचा डॅम आणि महत्वाच्या जागी आहे. हा डॅम चिश्ती नदीवर बांधण्यात आला आहे. येथे विद्युत निर्मिती प्रकल्पही आहे. 42 मेगावॅट विजेची निर्मिती केली जाते. सोबतच 75 हजार हेक्टर जमिनीवर शेती केली जाते. यासाठी पाणी या बंधाऱ्याचे वापरले जाते. 
 

Web Title: Afghanistan: Taliban attack on India-built Salma Dam 'failed' as result of Afghan forces counter-attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.