Afghanistan: वडील बंडखोरांच्या टोळीत सामील झाल्याचा संशय, लहान मुलाला लटकवलं फासावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 13:04 IST2021-09-28T13:01:45+5:302021-09-28T13:04:44+5:30
Afghanistan Taliban: अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर तालिबानच्या अनेक क्रूरतेच्या घटना समोर येत आहेत.

Afghanistan: वडील बंडखोरांच्या टोळीत सामील झाल्याचा संशय, लहान मुलाला लटकवलं फासावर
काबूल:दोन दशकानंतर अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आली. सत्ता मिळवल्यानंतर तालिबानने सर्वांना सार्वजनिक माफी जाहीर केली. पण, अजूनही दररोज अफगाणिस्तानातून कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या क्रूरतेच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे.
'दिल्लीत झालेली दंगल पूर्वनियोजित होती'; दिल्ली उच्च न्यायालयाची टिपण्णी
अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर तालिबानने कोणावरही सूड उगवणार नसल्याचे आश्वासन अफगाणी नागरिकांना दिले होते. पण पंजशीर प्रांतात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना ठार केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तखार प्रांतात तालिबानने एका लहान मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
हिमाचलच्या लाहौल स्पीतीमध्ये ट्रेकिंगला गेलेले 12 जण अडकले, 2 जणांचा मृत्यू
मीडिया रिपोर्टनुसार, मुलाचे वडिल तालिबानच्या विरोधातील अफगान रजिस्टेंस फोर्स ज्याला नॉर्दन अलायंसही म्हटले जाते, अशा बंडखोरांसोबत असल्याचा संशय तालिबानला होता. यामुळेच तालिबानने वडिलांची शिक्षा मुलाला दिली आणि त्याची हत्या करुन मृतदेहाला फासावर लटकवले. पंजशीर येथील काही माध्यमांनी ही माहिती दिली आहे.
यापूर्वीही अनेकांना मारले
तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर अनेक बंडखोरांना ठार करुन फासावर लटवल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्या घटनांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही तालिबानकडून प्रसिद्ध करण्यात येतात. पण, ठार केलेले लोक गुन्हेगार असल्याचा दावा तालिबानकडून करण्यात येतो.